Kolhapuri Tambda Rassa and Pandhra Rassa : रविवारच्या जेवणासाठी खास बेत! अस्सल गावरान झणझणीत कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा बनवा घरच्या घरी
कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा यांची चव अनेक खवय्यांच्या आवडीची आहे. मटण, खमंग मसाले आणि योग्य कृती वापरून हे दोन्ही रस्से घरी कसे बनवायचे, जाणून घ्या.

कोल्हापूरी तांबडा रस्सा म्हटलं की आठवते झणझणीत चव, लालसर रंग आणि मसाल्याचा खमंग सुगंध, तर पांढरा रस्सा म्हणजे मटणाच्या हाडांपासून तयार होणारी वेगळीच चव, चला मग कोल्हापूरला आपल्या घरात आणूया, दोन्ही रश्शांची घरच्या घरी बनवता येणारी रेसिपी पाहूया
तांबडा रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य : मटण 500 ग्रॅम, कांदे , सुके खोबरे - अर्धी वाटी, लसूण - 10 ते 12 पाकळ्या, आले, सुकी लाल मिरची - 6-10 तिखटपणानुसार, धणे, जिरे, काळीमिरी, दालचिनी,लवंग, हळद ,कोल्हापूरी मसाला, तेल, मीठ, पाणी, मटणाचा स्टॉक
मसाला भाजून घ्या : कढईत चांगले तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परता. सुके खोबरे घालून भाजा. त्यात जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंगा आणि सुकी लाल मिरची मंद आचेवर भाजा. सर्व साहित्य थंड झाल्यावर आले आणि लसूण घालून थोडे पाणी टाकत बारीक वाटून घ्या.
मटण शिजवून घ्या : मटणाला हळद,मीठ आणि थोडे आले - लसूणाची पेस्ट लावा. कुकरमध्ये मटण आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मटण मऊ होईपर्यंत शिजवा. मटण शिजल्यानंतर त्याचं पाणी टाकून देऊ नका हेच पाणी रश्श्यासाठी वापरायचे आहे
तांबडा रस्सा फोडणीला द्या : कढईत तेल गरम करा त्यात तयार केलेले वाटण चांगले परतून घ्या. जोपर्यंत वाटणाल बाजूने सुटलेला तिखट/ तेलकट कट दिसत नाही तोपर्यंत परता. आता त्यात कांदा - लसूण मसाला आणी काश्मीरी मिरची पावडर घालून परता. मटणाला तेल सुटल्यानंतर त्यात मटणाचे पीस आणि स्टॉक ओता. चवीनुसार मीठ घाला. 10 मिनिटे उकळून घ्या तेव्हा रश्श्याला छान कट येईल.
पांढरा रस्सा असा करा तयार : मटण - अर्धा किलो, काजू आणि बदाम पेस्ट किंवा पावडर- 10 ते 15 काजू, खसखस - 2 ते 3 चमचे, पांढरे तीळ - 2 चमचे, नारळाचे घट्ट दूध - 1 कप, खडे मसाले - लवंग, काळी मिरी, दालचिनी,हिरवे वेलदोडे, आले लसूण पेस्ट, तेल किंवा तूप, मीठ
मटण शिजवून घ्या : कुकरमध्ये धुवून घेतलेले मटण टाका. मीठ , आले , लसूण पेस्ट आणि पुरेसे पाणी घाला.मटण शिजवून त्याचे मऊ सूप तयार करा.हळद घालू नका रस्सा पांढरा करायचा आहे.
काजू, खसखस आणि पांढरे तीळ थोडे कोमट पाण्यात भिजवून किंवा सुकेच मिक्सरला बारीक वाटून त्याची एकदम गुळगुळीत पेस्ट तयार करा. कढईत 2 चमचे तेल घालून त्यात लवंगा, काळी मिरी, दालचिनी आणि हिरवी वेलची परतून घ्या. तयार केलेली काजू - खसखस तिळाची पेस्ट त्यात टाका,मंद आचेवर परतून घ्या. आता त्यात तयार केलेले चिकनचे सूप ओतून ढवळा,त्यात 1 कप नारळाचे घट्ट दूध घाला.त्यानंतर वाफेवर किंवा मंद आचेवर गरम करा.