
Skipping Breakfast side effects : अनेक लोकं सकाळचा नाश्ता करणे टाळतात. बऱ्याचदा हे उशिरा पर्यंत झोपल्यामुळे होऊ शकतं. न्याहारी न करता दुपारी जास्त जेवण करत असाल. तर ते ही अयोग्य आहे. नाश्ता न केल्याने तुमच्या आरोग्यावर इतका गंभीर परिणाम होतो की तुम्ही कल्पनाही करत नसाल. न्याहारी न करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरु शकते. न्याहारी न करण्याचे काय आहेत दुष्परिणाम जाणून घ्या.
न्याहारी हे दिवसातील पहिले जेवण असते. कारण आपल्या शरीराला रात्रभरात काहीही मिळालेले नसते. जेवल्यानंतरच शरीराला ऊर्जा मिळते. पण जेव्हा तुम्ही नाश्ता करणे टाळतात तेव्हा उर्जेसाठी दिवसभरात जास्त चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे नाश्ता करणे फार महत्त्वाचे आहे.
रात्रभर काहीही आपण खात नाही. त्यामुळे शरीरातील उर्जेची पातळी कमी झालेली असते. त्यामुळे जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर यामुळे ऊर्जा कमी होते. नाश्ता केल्यानंतरच त्याची भरपाई होते. नाश्ता न केल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि शरीर अशक्त वाटू शकते. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. यामुळे कामावर देखील परिणाम होतो.
न्याहारी केल्यानंतर शरीराला ग्लुकोज मिळते, जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी राखते. पण नाश्ता न केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळे मूड बिघडू शकतो आणि त्यामुळे चिडचिड होऊ शकते. यामुळे लवकर राग ही येतो. जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.
तुम्ही जेव्हा न्याहारी करता तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. पण न्याहारी न केल्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वेगवेगळे आजार किंवा रोग होऊ शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
तुम्हाला जर तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला न्याहारी करणे आवश्यक आहे. आहार चांगला असेल तर तुम्हाला अनेक आजारांपासून होणारा धोका कमी असतो. सकाळी नाश्ता चुकवत असाल तर यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब वाढणे आणि मधुमेहाचा धोका वाढू वाढतो. हे सर्व हृदयरोगासाठी चांगले नाही. नाश्ता न केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. नाश्ता उशीरा करणे देखील तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकते.