AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी नाराज असेल तर चुकूनही बोलू नका ही ३ वाक्ये, अन्यथा नात्यात वाढू शकतो दुरावा, शेवटच तर..

जर तुमची देखील पत्नी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नाराज असेल तर त्या वेळी चुकूनही ही तीन वाक्य तिला बोलू नका. अन्यथा नात्यामध्ये येऊ शकतो अडथळा. कोणती आहेत ती तीन वाक्य?

पत्नी नाराज असेल तर चुकूनही बोलू नका ही ३ वाक्ये, अन्यथा नात्यात वाढू शकतो दुरावा, शेवटच तर..
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 24, 2026 | 7:23 PM
Share

पती-पत्नीचं नातं हे प्रेम, विश्वास आणि समजुतीवर टिकलेलं असतं. या नात्यात प्रेमासोबतच कधीकधी वाद, भांडणं आणि मतभेदही होतात. छोट्या-मोठ्या कारणांवरून दोघांमध्ये नाराजी होणं स्वाभाविक आहे. मात्र, रागाच्या भरात बोललेले काही शब्द जोडीदाराच्या मनाला लागतात आणि त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो. अनेकदा वाद वाढल्यानंतर पती-पत्नी एकमेकांशी अनेक दिवस बोलणंही टाळतात. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम आणि समजूतदारपणा दाखवणं महत्त्वाचं असतं. पत्नी नाराज असेल तर तिच्याशी बोलताना कोणती तीन वाक्ये टाळावीत. जाणून घ्या.

‘तू प्रत्येक गोष्टीवर रागावतेस’

पत्नी आधीच एखाद्या कारणामुळे नाराज किंवा अस्वस्थ असेल तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी ‘तू प्रत्येक गोष्टीवर रागावतेस’ असं बोलल्याने तिच्या भावना दुर्लक्षित केल्या जात असल्याची भावना निर्माण होऊ शकते. एखादी गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असली तरी ती दुसऱ्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असू शकते. त्यामुळे लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐका आणि तिला नेमकं काय खटकत आहे हे समजून घ्या.

‘तुला फक्त भांडणच करता येतं’

वाद सुरू असताना पत्नीला ‘तुला फक्त भांडणच करता येतं’ असं म्हणणं टाळावं. अशा शब्दांमुळे मूळ विषय बाजूला राहून वाद आणखी वाढू शकतो. पत्नीला आपला अपमान झाल्यासारखं वाटू शकतं आणि त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होण्याची शक्यता असते. त्याऐवजी नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे मतभेद झाले आहेत, यावर शांतपणे चर्चा करा. एकमेकांना दोष देण्याऐवजी समस्या सोडवण्यावर भर द्या.

‘चूक तुझी आहे, माझी नाही’

पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर अनेकदा स्वतःची बाजू योग्य ठरवण्याचा आणि समोरच्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ‘चूक तुझी आहे, माझी नाही’ असं म्हटल्याने परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकते. एखाद्या प्रसंगात तुमची चूक नसली तरी पत्नीच्या भावना आणि तिची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वादात कोण जिंकलं, हे ठरवण्यापेक्षा दोघांनी मिळून तोडगा काढणं नात्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं.

पती-पत्नीच्या नात्यात संवाद महत्त्वाचा

नात्यात मतभेद होणं चुकीचं नाही; मात्र ते कसे हाताळले जातात, हे अधिक महत्त्वाचं आहे. पत्नी नाराज असेल, तर तिला थोडा वेळ द्या, तिचं म्हणणं ऐका आणि रागाच्या भरात दुखावणारे शब्द बोलणं टाळा. गरज पडल्यास दोघंही शांत झाल्यानंतर विषयावर चर्चा करा.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...