AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात Eyebrows करण्याचा खर्च 50 रुपये, तर अमेरिकेत किती डॉलर मोजावे लागतात, किंमत जाणून बसेल झटका

कुठेही जायचं असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल तर, महिला सर्वात आधी पार्लरमध्ये जातात. कारण प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण सुंदर दिसायला हवं… अशात आयब्रोला सर्वात जास्त महत्त्व आहे. आयब्रो चांगले असतील तर, सौंदर्य देखील फुलून दिसतं… असं म्हटलं जातं. भारतात आयब्रो करायचे 20 ते 50 रुपये घेतात आणि परफेक्ट शेपमध्ये आयब्रो करुन दिले जातात… […]

भारतात Eyebrows करण्याचा खर्च 50 रुपये, तर अमेरिकेत किती डॉलर मोजावे लागतात, किंमत जाणून बसेल झटका
Eyebrows
| Updated on: Apr 16, 2026 | 9:59 AM
Share

कुठेही जायचं असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल तर, महिला सर्वात आधी पार्लरमध्ये जातात. कारण प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण सुंदर दिसायला हवं… अशात आयब्रोला सर्वात जास्त महत्त्व आहे. आयब्रो चांगले असतील तर, सौंदर्य देखील फुलून दिसतं… असं म्हटलं जातं. भारतात आयब्रो करायचे 20 ते 50 रुपये घेतात आणि परफेक्ट शेपमध्ये आयब्रो करुन दिले जातात… तुम्ही कधी विचार केला आहे की, भारतात आयब्रोसाठी जवळपास 50 रुपये मोजवे लागतात. पण त्याच कामासाठी अमेरिकेत किती पैसे मोजावे लागतात. तर अमेरिकेत आयब्रो करण्यासाठी मोठा खर्च येतो… भारतातील आणि अमेरिकेतील खर्च फार वेगळा आहे.

अमेरिकेत स्थलांतरित झाल्यावर किंवा तिथे राहताना अनेक भारतीय वंशाच्या लोकांना या धक्क्याचा सामना करावा लागतो. भारतात आयब्रोसाठी 20 ते 50 रुपये लागतात, पण अमेरिकेत त्यासाठी 10 ते 42 डॉलर्स लागतात, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 850 ते 3 हजार 500 रुपये होतात.

स्वस्त भारतीय थ्रेडिंग सलून किंवा आशियाई ठिकाणी, 650 ते 1,250 रुपयांमध्ये तुमच्या आयब्रो सेट करून घेऊ शकता. सर्वसाधारण अमेरिकन सलून किंवा मध्यम-स्तरीय ठिकाणी, किंमत 1 हजार 250 आणि 2 हजार 100 पर्यंत असू शकतात, तर न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये किंवा उच्च-स्तरीय स्टुडिओमध्ये आयब्रो करण्यासाठी 2 हजार 100 ते 3 हजार 500 रुपये मोजावे लागतात.

एवढंच नाही तर, अमेरिकेट टीप देणं देखील सामान्य गोष्ट आहे. अमेरिकेत टीप 15 ते 20 टक्के देतात. त्यामुळे आयब्रो करण्यासाठी खर्च आणखी वाढतो… पण या किंमती वाढण्याचे देखील काही कारणे आहे… अमेरिकेतील पार्लरचा खर्च, भाडं, कर्मचाऱ्याचे पगार, व्यवसाय खर्च… भारताच्या तुलनेत अधिक आहे.

याव्यतिरिक्त, परवाना आणि नियमनामध्ये देखील मोठा खर्च येतो. अमेरिकेत ब्यूटी सर्विसचे कडक नियम आहेत, ज्यामुळे खर्च वाढतो. भारतात आयब्रो करण्याचा वार्षिक खर्च अंदाजे 250–300 रुपये आहे, तर अमेरिकेत हा वार्षिक खर्च 21 हजार ते 34 हजार पर्यंत असतो. ही किंमत फार मोठी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...