सुंदर त्वचेसाठी शरीरावर लावा ‘हा’ नैसर्गिक लेप, होतील आश्चर्यकारक फायदे

हिरव्या पाले भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामधून अनेक विटामिन, खनिजे मिळतात.

सुंदर त्वचेसाठी शरीरावर लावा ‘हा’ नैसर्गिक लेप, होतील आश्चर्यकारक फायदे

मुंबई : हिरव्या पाले भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामधून अनेक विटामिन, खनिजे मिळतात. भाज्या खाल्ल्यामुळे आपली त्वचा देखील चांगली होते. पण आज आम्ही तुम्हाला एका आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक भाजीबद्दल सांगणार आहोत. पडवळची भाजी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. या भाजीपासून तुम्ही चेहऱ्यासाठी लेप देखील तयार करू शकता, हे माहीत आहे का? त्वचा सुंदर व मऊ होण्यासाठी पडवळ अतिशय प्रभावी आहे. (Apply natural coating on the body for beautiful skin)

-आपल्या आवश्यकतेनुसार पडवळ घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा. पेस्टमध्ये दोन चमचे मध मिक्स करा.आता हा लेप संपूर्ण शरीरावर लावा किंवा ज्या भागाची त्वचा अधिक रूक्ष झाली आहे, त्याच ठिकाणी उपयोग करा. या लेपाच्या उपयोगामुळे त्वचेशी संबंधित समस्या हळू-हळू दूर होतात.

-पडवळच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के व्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस यासारख्या आवश्यक तत्त्वांचा समावेश आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त या भाजीचा आपण आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्येही समावेश करू शकता.

-पडवळ आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या भाजीच्या पानांपासून हर्बल अँटी- डँड्रफ शॅम्पू देखील तयार केला जातो. त्वचा सुंदर आणि नितळ राहण्यासाठी आपण पडवळीच्या पानांचाही फेस पॅकमध्ये समावेश करू शकता.

-उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!

(Apply natural coating on the body for beautiful skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI