AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एक चिमूटभर हिंग पुरेसे, जाणून घ्या त्याचे फायदे! 

हिंग प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळते. हे पारंपारिक मसाला म्हणून वापरले जाते. हिंगाचा वापर सर्व पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. डाळींच्या मिश्रणापासून ते भाज्या, करी इ. काही ठिकाणी कैरी आणि हिंगापासून बनवलेले लोणचेही खाल्ले जाते. चवीसाठी आणि चांगला रंग येण्यासाठी भाज्यांमध्ये जास्त करून हिंग वापरले जाते.

Health Tips : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एक चिमूटभर हिंग पुरेसे, जाणून घ्या त्याचे फायदे! 
हिंग आरोग्यासाठी फायदेशीर
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 26, 2021 | 7:22 AM
Share

मुंबई : हिंग प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळते. हे पारंपारिक मसाला म्हणून वापरले जाते. हिंगाचा वापर सर्व पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. डाळींच्या मिश्रणापासून ते भाज्या, करी इ. काही ठिकाणी कैरी आणि हिंगापासून बनवलेले लोणचेही खाल्ले जाते. चवीसाठी आणि चांगला रंग येण्यासाठी भाज्यांमध्ये जास्त करून हिंग वापरले जाते.

तसेच जेवणात सुगंध आणण्यासाठी हिंग टाकले जाते. पण हिंग फक्त चव वाढवण्याचं काम करत नाहीतर आरोग्याच्या दृष्टीनेही हे खूप फायदेशीर मानले जाते. पोटाच्या समस्यांवर हिंग हा रामबाण उपाय मानला जातो. याशिवाय हिंगामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे शरीराच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

हिंग बीपी नियंत्रित करते

हिंगामध्ये असलेले पोषक तत्व बीपी नियंत्रित करण्याचे काम करतात. ते शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतात आणि रक्त पातळ करून रक्त परिसंचरण सुधारतात. अशा स्थितीत स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो.

पाचक प्रणाली सुधारणे

जर तुम्हाला पचन, गॅस, आंबटपणा, बद्धकोष्ठता इत्यादींशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही नियमितपणे हिंग घ्यावे. ते खूप फायदे देते. याशिवाय एक चमचा पाण्यात हिंग विरघळून ते पोटाभवती लावल्याने पोटदुखीवर आराम मिळतो.

श्वसनाच्या समस्या दूर होतात

विषाणूविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, खोकला, दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी हिंग फायदेशीर आहे. हिंग छातीचा घट्टपणा दूर करण्यासाठी देखील काम करते.

थंडीपासून आराम मिळतो

जर तुम्हाला खूप थंड वाटत असेल, रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, ज्यामुळे तुम्हाला खूप लवकर हंगामी आजार होण्याची शक्यता असते. तर नियमितपणे हिंग घ्या. यातून तुम्हाला खूप आराम मिळेल.

दातदुखीची समस्या दूर होते

हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म तसेच बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. अशा स्थितीत दातदुखीमध्ये खूप आराम मिळतो. यासाठी तुम्ही हिंगाच्या पाण्याने गार्गल करू शकता.

कसे वापरायचे

या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दररोज रात्री झोपताना हिंगाचे पाणी प्या. यासाठी अर्धा ग्लास कोमट पाण्यात 2 चिमूटभर हिंग पावडर मिसळून प्या. दररोज हिंगाचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Asafoetida extremely beneficial for health)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!