AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Breakfast | नेहमी तंदुरुस्त राहायचंय? मग नाश्त्यात खा ‘हे’ भारतीय पदार्थ!

नाश्त्याच्या वेळी पौष्टीक पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अभ्यास असे दर्शवतो की, जे लोक दररोज नाश्ता करतात ते, नाश्ता न करणाऱ्यांच्या तुलनेत वजन कमी करण्यास अधिक सक्षम असतात.

Healthy Breakfast | नेहमी तंदुरुस्त राहायचंय? मग नाश्त्यात खा ‘हे’ भारतीय पदार्थ!
हेल्दी नाश्ता
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 02, 2021 | 1:13 PM
Share

मुंबई : नाश्त्याच्या वेळी पौष्टीक पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अभ्यास असे दर्शवतो की, जे लोक दररोज नाश्ता करतात ते, नाश्ता न करणाऱ्यांच्या तुलनेत वजन कमी करण्यास अधिक सक्षम असतात. म्हणून नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. निरोगी नाश्त्यामुळे शरीराचे चयापचय वाढते, ज्यामुळे तुमचा उष्मांक देखील वाढतो. निरोगी न्याहारीमध्ये भाज्या, फळे, कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थ, लीन प्रोटीन आणि संपूर्ण धान्य इत्यादी बर्‍याच गोष्टींचा समावेश केला पाहिजे. चला तर, अशाच 5 भारतीय पदार्थांबद्द्ल जाणून घेऊया, जे तुम्हाला नेहमी निरोगी ठेवतील (Healthy Breakfast Must have these Indian dishes in breakfast to keep body healthy).

पोहे

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे खाऊ शकता. त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी आहे आणि चरबीही अजिबात नाही. पोह्यामध्ये लोह आणि फायबर अधिक असते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते. याशिवाय असे बरेच गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते.

इडली

जर तुम्हाला इडली आवडत असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, इडली तुमचे वजन कमी करण्यात अतिशय फायदेशीर ठरते. इडली ही दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ आहे आणि विशेषत: न्याहारीच्या वेळी ती खाल्ला जातो. तांदूळ वाटून तयार केला जाणारा ‘इडली’ हा पदार्थ, एक निरोगी अन्न आहे. त्यात तेल आणि लोणी वापरले जात नाही. इडलीमध्ये कॅलरींचे प्रमाणही कमी आहे. हेच कारण आहे की, तेलात तळलेले डंपलिंग्ज, समोसे आणि इतर स्नॅक्सपेक्षा हे अधिक चांगले आहे. त्याच बरोबर तुम्ही इडली बरोबर सर्व्ह केली जाणारी साईड डिश आणि चटणीदेखील खाणे टाळू शकता. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.

उपमा

उपमा हा देखील दाक्षिणात्य खाद्य पदार्थ आहे. आज तो भारताच्या कानाकोपऱ्यात पसंत केला जातो. उपमा हा पदार्थ पचनास खूप हलका आणि निरोगी आहे. रव्यापासून उपमा तयार केला जातो. वजन कमी करण्यासाठी हा नाश्त्याचा एक चांगला पर्याय आहे. उपम्यामध्ये भरपूर पोषण आहे, जे आपल्या आरोग्यास अनेक मार्गांनी लाभदायक ठरते (Healthy Breakfast Must have these Indian dishes in breakfast to keep body healthy).

डोसा

डोसा हा देखील दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि स्नॅक म्हणूनही खाऊ शकता. डोसा कार्ब आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हा आपल्याला बर्‍याच काळासाठी  उर्जावान बनवतो. यामुळे आपले हाडे आणि स्नायूही बळकट होतात. या पदार्थामध्ये चरबी कमी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलरी वाढत नाहीत.

अंडी

अंडी पोषण समृद्ध आहेत. अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये जीवनसत्व बी 12, डी आणि अँटीऑक्सिडेंट्स ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन असतात, ज्यामुळे आपल्या शरीरास बरेच फायदे होतात. अंड्यांद्वारे आपले वजन देखील कमी होते, अंड्यांमधील पौष्टिकतेमुळे आपली चयापचय ठीक होते. अंड्यांमध्ये भरपूर चरबी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

(Healthy Breakfast Must have these Indian dishes in breakfast to keep body healthy)

हेही वाचा :

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा