Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्येच होते. पपई केवळ खाण्यासाठीच नाही, तर इतर अनेक कामांमध्ये उपयोगी पडते. विशेष करून पचन संबंधी औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मात्र, पपईचे अति सेवन देखील आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपणही पपईचे अतिसेवन करत असाल तर तुम्ही अनेक आजारांना निमंत्रणच देत आहात…(Eating too much papaya is dangerous for health)

पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं फायद्याचं आहे तेवढेच ते खाताना काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर त्याचे तोटेही आपल्याला होतात. त्वचा, आतड्यांचे विकार इथपासून ते रक्ताभिसरण आणि पेशींपर्यंत सर्वांसाठी पपई जरी लाभदायक असली तरीही पपई अति खाण्याचे किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यानं त्याचे तोटे होतात.

उन्हाळ्यात टाळा पपई!

तुमची पचनक्रीया या दिवसांमध्ये थोडी नाजूक झालेले असते त्यामुळे यावेळी पपई खाल्ली तर पचनसंस्थेवर त्यांचा परिणाम होण्याची चिन्हं असतात. पपई पचायला जड असल्यानं अपचनाचा त्रास होऊ शकतो. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाणं टाळावं. त्यामुळे करपट ढेकर येणं, अपचन, जुलाब किंवा उलट्या होण्याचा धोका असतो. काहीवेळा थंडीत पपई खाल्ल्यानं पोटदुखीचा त्रासही उद्भवण्याची शक्यता असते (Eating too much papaya is dangerous for health).

पपईचा गुणधर्म उष्ण असतो. अति पपई खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते. नियमित पपईच्या सेवनामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं जे मासिक पाळीसाठी किंवा मासिक पाळीत समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे पपईचं अतिसेवन करणं वेळीच थांबवणं आवश्यक आहे. यासोबतच  गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो.

ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांनी देखील जास्त पपई खाऊ नये. जास्त पपई खाल्ल्यास हार्ट बीटचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच पपईमुळे हृदयाशी संबंधित इतरही अनेक समस्या वाढू शकतात. डॉक्टरांशी बोलल्यानंतर हृदयरोग्यांनी बोलूनच हृदयाशी संबंधित रूग्णांनी पपईचे सेवन केलेले कधीही चांगले.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी किंवा आहारबदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Eating too much papaya is dangerous for health)

हेही वाचा :

केळी सुपरफूड, मात्र रिकाम्या पोटी खाणे टाळा…

रिकाम्या पोटी ‘चहा’ पिणे आरोग्यासाठी हानिकारक !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI