.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिक्स करून प्या, वाचा ! 

हिवाळा असो किंवा उन्हाळा, शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी पिण्यामुळे तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते.

आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिक्स करून प्या, वाचा ! 
मध आणि कोमट पाणी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 24, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई : ऋतू कोणताही असो शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी पिण्यामुळे तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच, डिहायड्रेशन देखील टाळता. मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात आपण मध मिक्स करून पिला तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (It is beneficial to mix honey in hot water and drink it)

मधयुक्त कोमट पाणी घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पाणी गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि मध घाला. साधारण 20 ते 25 मिनिटे हे उकळूद्या. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो.

नकळतपणे काही चुकीचं खाल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी गरम पाणी पचनतंत्राची मदत करु शकतं. आपण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर आपण दररोज गरम पाण्यात मध मिक्स करून पिला पाहिजे. गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय बळकट होते, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून, ते पाणी प्यायल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते.गरम पाणी लठ्ठ लोकांसाठी एक वरदान आहे.

जर आपल्यालाही लठ्ठपणाची समस्या असेल, तर दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल. दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. धकाधकीच्या जीवनात बरेच लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येसह झगडत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(It is beneficial to mix honey in hot water and drink it)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर