Skin Care : त्वचा काळपट झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

बऱ्याचवेळा आपली त्वचा अचानक काळपट पडते. त्वचेवरील काळपटपणा काढण्यासाठी आपण विविध सौंदर्य प्रसाधने वापरतो. मात्र, तरीही त्वचेवरील काळपटपणा जात नाही.

Skin Care : त्वचा काळपट झाली आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
सुंदर त्वचा

मुंबई : बऱ्याचवेळा आपली त्वचा अचानक काळपट पडते. त्वचेवरील काळपटपणा काढण्यासाठी आपण विविध सौंदर्य प्रसाधने वापरतो. मात्र, तरीही त्वचेवरील काळपटपणा जात नाही. त्वचेवरील काळपटपणा काढण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळपटपणा कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे हे उपाय करण्यासाठी तुम्हाला खर्च देखील लागणार नाही. घरात असलेल्या साहित्याच्या मदतीने तुम्ही त्वचेवरील काळपटपणा काढू शकता. (Do this remedy to get beautiful and fair skin)

त्वचेवरील काढपटपणा काढण्यासाठी बेसन पीठ आणि तांदळाचे पाणी आपल्याला लागणार आहे. यासाठी चार चमचे बेसन पीठ घ्या आणि त्यामध्ये शिजत असलेल्या तांदळामधील पाणी मिक्स करा. याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि काळपटपणा असलेल्या त्वचेवर लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आपण आठवड्यातून चार वेळा केला तर काळपट त्वचेची समस्या कायमची दूर होण्यास नक्की मदत होईल.

खोबरेल तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसंच काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी आणि त्वचेवर लावा साधारण 25 ते 30 मिनिटे लावून ठेवा असे आठवड्यातून तीन वेळा करा यामुळे काळपटपणा निघून जाईल. दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे काळपट त्वचेवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच ठेवून नंतर धुवून टाकावी. लिंबाचा रस हा अत्यंत आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे.

लिंबाचा रस काळपट त्वचेवर लावा आणि जवळपास 1 तास तो तसाच ठेवा. एक तास झाल्यानंतर स्वच्छ धुवून टाका. दररोज हा उपाय केल्यास काळपटपणा दूर होईल. टोमॅटो मिक्सरमधून बारिक पेस्ट करुन घ्या. काळपट त्वचेवर लावा. 20 मिनटांनंतर धुवून घ्या. एका आठवड्यात तीनवेळा हे केल्याने काळपटपणा दूर होईल. लिंबूमध्ये साखर मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे काळपटपणा कमी होतो.

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Do this remedy to get beautiful and fair skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI