दिवसातून तीन ‘अंडी’ खाण्याचे मोठे फायदे जाणून घ्या!

अंडे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी असते. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

दिवसातून तीन 'अंडी' खाण्याचे मोठे फायदे जाणून घ्या!
अंडी

मुंबई : अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. (Amazing benefits of eating three eggs in a day)

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

यामुळे तुम्ही जर दिवसांतून तीन अंडे खाल्ली तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्ही अनेक रोगांपासून दूर देखील राहू शकतात. यामुळे आजपासूनच आपण आहारामध्ये तीन अंडे घेण्यास सुरूवात करावी. अंड्याच्या पिवळ्या बलकातील घटक थेट आपल्या हृदयावर परिणाम करतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे निरोगी एलडीएल ब्लड कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत संतृप्त अन्न म्हणून शरीराचे पोषण करते. अंड्यातील पिवळ्या बलकाचा उष्मांक 55 आहे. म्हणून, आपण हिवाळ्यामध्ये अंड्यातील पिवळ्या बलकाचे सेवन केले जाते. अंड्यात ट्रिप्टोफेन आणि टायरोसिन हे घटक असतात. यासह, अंड्यांमध्ये अमिनो आम्ल देखील आहेत जे, आपला हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.

संबंधीत बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Amazing benefits of eating three eggs in a day)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI