Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

कधीकधी या घोरण्याचा आवाज इतका जोरात असतो की, झोपी गेलेल्या इतर लोकांनाही त्याचा त्रास होतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:15 PM, 4 Dec 2020
Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या...

मुंबई : झोपेच्या वेळी बर्‍याच लोकांना घोरण्याची सवय (Snoring Problem) असते. कधीकधी या घोरण्याचा आवाज इतका जोरात असतो की, झोपी गेलेल्या इतर लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे इतरांची झोपदेखील मोड होते. कधीकधी जोरात घोरणे एक गंभीर समस्या दर्शवते. चला तर, मग जाणून घेऊयात घोरण्याची समस्या का उदभवते आणि सोप्या मार्गांनी त्यावर मात कशी करावी (Tips for reduce Snoring Problem).

का उद्भवते घोरण्याची समस्या?

झोपे दरम्यान घोरण्याचा कर्कश आवाज ऐकू येतो. जेव्हा श्वास घेताना हवेचा प्रवाह घशात स्थित उतींमध्ये कंप निर्माण करतो तेव्हा घोरण्याची समस्या निर्माण होते. जेव्हा आपण गाढ झोपता तेव्हा आपले तोंड, जीभ आणि घश्याच्या स्नायूंना आराम मिळतो. या वेळी, घश्याच्या ऊती इतक्या सैल झालेल्या असतात की त्या वायुमार्गास अंशतः बंद करतात आणि यामुळे घशात कंपने निर्माण होतात.

वायुमार्ग जितका अरुंद असतो, हवेचा वेग तितकाच वेगवान होत जातो. या ऊतींमुळे कंपन वाढते आणि घोरण्याचा आवाज सतत वाढत जातो. घोरण्याची समस्या उद्भवण्यास सायनस,  मद्यपानाचे अतिसेवन, अ‍ॅलर्जी, सर्दी किंवा लठ्ठपणा यासारखी अनेक कारणे असू शकतात. याचा संबंध ‘ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया’ नावाच्या व्याधीशी देखील जोडलेला आहे. म्हणूनच काही सोप्या पद्धतींचा वापर करून घोरण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळवू शकता (Tips for reduce Snoring Problem).

झोपण्याची पद्धत बदला

पाठीवर झोपल्यामुळे, जीभ आणि टाळू वायुमार्गास संकुचित करते आणि यामुळे झोपेच्या दरम्यान कंपनाचा आवाज निर्माण होतो. उजव्या किंवा डाव्या बाजूवर झोपल्याने घोरणे प्रतिबंधित होते. शरीराच्या बरोबरीच्या म्हणजेच कमी उंचीच्या उशीवर झोपल्याने देखील घोरणे कमी होते. कारण ते एका बाजूला शरीराचे संतुलन राखते. डोके वर करून झोपल्यामुळे देखील घोरणे कमी होते. कारण झोपण्याची ही पद्धत नाकाचा वायुमार्ग उघडते आणि घोरण्याला प्रतिबंधित करते. घोरण्यामुळे घशात वेदना देखील होऊ शकतात.

वजन कमी करणे

वजन कमी करणे देखील काही लोकांना घोरण्याची समस्या कमी करण्यात मदत करू शकते. तथापि, हे प्रत्येकास लागू होत नाही. काही बारीक लोक देखील घोरण्याच्या समस्येस अपवाद नसतात. जर आपण वजन वाढण्याआधी घोरत नसाल आणि वजन वाढल्यानंतर आपणास ही समस्या उद्भवली असेल, तर वजन कमी केल्याने आपण घोरण्यापासून मुक्त होऊ शकता. गळ्याभोवती वाढलेली अधिक चरबी घोरण्याच्या समस्येस कारण ठरू शकते (Tips for reduce Snoring Problem).

मद्यपानापासून दूर रहा

मद्यपान घश्याच्या स्नायूंना अरुंद करते ज्यामुळे घोरणे सुरू होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, झोपेच्या चार ते पाच तास आधी मद्यपान केल्याने घोरण्याची समस्या वाढण्याची शक्यता असते. सामान्यत: जे लोक घोरत नाहीत, ते मद्यपान केल्यावर घोरण्यास देखील सुरुवात करतात.

झोपेची वेळ पाळा

वेळेवर झोप न येणे देखील घोरण्याची समस्या निर्माण करू शकते. जेव्हा आपण बराच वेळ जागे राहतो आणि नंतर झोपतो, तेव्हा शरीर पूर्णपणे थकलेले असते आणि खूप गाढ झोप लागते. या अवस्थेत देखील स्नायू संकुचित होतात आणि घोरणे सुरू होते (Tips for reduce Snoring Problem).

नाक खुले ठेवा

जर आपण नाकाने घोरत असाल तर नाकाचा वायुमार्ग मोकळा ठेवल्यास ही समस्या कमी होऊ शकते. सर्दीमुळे किंवा कोणत्याही कारणास्तव नाक बंद झाल्यावर घोरणे अधिक वाढते. झोपण्याआधी आधी कोमट पाण्याने आंघोळ केल्याने नाकाचे छिद्र मोकळी होतात.

उशी बदला

कधीकधी उशीच्या अ‍ॅलर्जीमुळे सुद्धा घोरण्याची समस्या उद्भवू शकते. उशीमध्ये जमा होणाऱ्या धूळ कणांच्या अ‍ॅलर्जीमुळे घोरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. दर दोन आठवड्यांनी एकदा उशा खुल्या हवेत ठेवा आणि दर सहा महिन्यांनी आपली उशी बदला. यामुळे आपली घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.

हायड्रेटेड रहा

जास्तीत जास्त पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. डिहायड्रेशनमुळे नाक आणि टाळू चिकट होतात आणि यामुळे घोरणे अधिक वारंवार होते. यावर मात करण्यासाठी, भरपूर पाणी प्या आणि द्रव आहाराचे प्रमाण वाढवा.

(Tips for reduce Snoring Problem)