AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात चित्रपटाची कथा, गाजावाजा न करता गुपचूप कमवले 375 कोटी, आता OTT वर होतोय रिलीज!

ना कसलाही गाजावाजा करता 'बॉर्डर 2'च्या वादळात या चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस. गुपचूप केली 375 कोटींची कमाई. आता ओटीटीवर होतोय रिलीज.

याला म्हणतात चित्रपटाची कथा, गाजावाजा न करता गुपचूप कमवले 375 कोटी, आता OTT वर होतोय रिलीज!
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 07, 2026 | 2:35 PM
Share

MSVPG OTT Release: बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घालतात. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होते. पण असे काही चित्रपट असतात जे प्रदर्शित होतात पण त्याची कोणाली माहिती नसते आणि ते चित्रपट सुपरहिट होतात. असाच एक चित्रपट आहे जो प्रदर्शित झाला पण त्या चित्रपटाची कसलीही चर्चा सोशल मीडियावर झाली नाही तरी देखील तो चित्रपट सुपरहिट झाला.

अनिल रविपुडी यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘मन शंकरा वारा प्रसाद गारू’ या भव्य तेलुगु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत वेंकटेश दग्गुबाती, नयनतारा आणि कॅथरीन ट्रेसा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याने कमाईचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

विशेष म्हणजे, सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’सारख्या मोठ्या चित्रपटाच्या स्पर्धेतही ‘मन शंकरा वारा प्रसाद गारू’ने आपली मजबूत पकड कायम ठेवली. कोणताही गाजावाजा न करता या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचला. यामुळेच हा चित्रपट या वर्षातील पहिला सर्वात मोठा तेलुगु ब्लॉकबस्टर ठरला आहे.

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. थिएटरमध्ये पाहू न शकलेले प्रेक्षक आणि पुन्हा एकदा हा चित्रपट अनुभवू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ‘मन शंकरा वारा प्रसाद गारू’ 11 फेब्रुवारी रोजी Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. Zee5 ने या चित्रपटाचे एक्सक्लूसिव डिजिटल हक्क विकत घेतले असून, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

Zee 5 वर पाहता येणार चित्रपट

Zee5 च्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 11 फेब्रुवारी आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा. मेगा विक्टोरियस ब्लॉकबस्टर तुमच्या भेटीला येत आहे फक्त Zee5 वर. हा चित्रपट तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, मराठी आणि बंगाली अशा सात भाषांमध्ये स्ट्रीम केला जाणार आहे.

कमाईच्या आकडेवारीकडे पाहिले असता रिलीजच्या 26 व्या दिवशी चित्रपटाने 42 लाख रुपयांची कमाई केली. यानंतर भारतातील 26 दिवसांची एकूण कमाई 210.77 कोटी रुपये झाली आहे. तर थिएटरमध्ये 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाचे जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल 375 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.