DC vs MI Score and Updates IPL 2026: दिल्लीचा जबरदस्त विजय, मुंबईवर 6 विकेट्सने मात
Delhi Capitals vs Mumbai Indians Indian Premier League 2026 And Highights In Marathi : दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपला एकूण दुसरा तर घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना होता. दोन्ही संघांनी मोसमात विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे दोन्ही संघांपैकी कोणता संघ विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र होम टीम दिल्लीने मुंबईला पराभूत केलं आणि सलग दुसरा सामना जिंकण्याची कामगिरी केली. दिल्लीने 163 रन्सचं टार्गेट हे इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी याच्या 90 धावांच्या योगदानाच्या मदतीेने 18.1 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. दिल्लीने यासह सलग दुसरा सामना जिंकण्याची कामगिरी केली.
LIVE Cricket Score & Updates
-
DC vs MI Live Score Updates : दिल्लीचा जबरदस्त विजय, मुंबईवर 6 विकेट्सने मात
दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. दिल्लीने 163 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. समीर रिझवी हा दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. समीरने दिल्लीसाठी सर्वाधिक 90 धावा केल्या. तर पाथुमन निसांका याने 44 धावांचं योगदान दिलं. दिल्लीचा हा सलाग दुसरा विजय ठरला.
-
DC vs MI Live Score Updates : समीर रिझवीच्या वादळी खेळीचा शेवट, दिल्लीला चौथा धक्का
कॉर्बिन बॉश याने समीर रिझवी याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट करत दिल्लीला चौथा धक्का दिला आहे. मात्र समीरने त्याचं पूर्ण योगदान देत दिल्लीला विजयाजवळ आणून ठेवलं आहे. समीरने 51 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 7 फोरसह 90 रन्स केल्या.
-
-
DC vs MI Live Score Updates : समीर रिझवीचा तडाखा सुरुच, दिल्ली विजयाच्या दिशेने
इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी याने मुंबई विरुद्ध वादळी खेळी करुन दिल्लीला विजयाजवळ आणून ठेवलं आहे. दिल्लीने 163 धावांचा पाठलाग करताना 15 ओव्हरमध्ये 3 विके्टस गमावून 138 धावा केल्या आहेत. समीर रिझवी 48 बॉलमध्ये 87 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. आता दिल्लीला 30 बॉलमध्ये 25 रन्सची गरज आहे.
-
DC vs MI Live Score Updates : समीर रिझवीचा इम्पॅक्ट, सलग तिसरं अर्धशतक, दिल्ली मजबूत स्थितीत
दिल्ली कॅपिट्ल्सचा फलंदाज समीर रिझवी याने कमाल केली आहे. समीरने मुंबई इंडियन्स विरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. समीरने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ही कामगिरी केली आहे. समीरचं हे सलग तिसरं अर्धशतक ठरलं. समीरने षटकार ठोकत अर्धशतक झळकावलं.
-
DC vs MI Live Score, IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का, निस्संका 42 धावा करून बाद
दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का बसला आहे. पाथुम निस्संका 42 धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सने 10 षटकात 3 गडी गमवून 73 धावा केल्या आहेत.
-
-
DC vs MI Live Score, IPL 2026: पावरप्लेच्या 6 षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या 42 धावा
पावर प्लेच्या सहा षटकात दिल्ली कॅपिटल्सने 2 गडी गमवून 42 धावा केल्या. शार्दुल ठाकुरच्या एका षटकात फक्त 16 धावा आल्या. या व्यतिरिक्त इतर षटकात फार काही करू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने दोन षटकात फक्त 9 धावा दिल्या.
-
DC vs MI Live Score, IPL 2026: शार्दुल ठाकुरचं महागड षटक, दिल्या 16 धावा
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचं पाचवं षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकुर आला होता. पण हे षटक महाग पडलं. कारण या षटकात एकूण 16 धावा दिल्या. या षटकात 1,6,4,0,4,1 अशा धावा आल्या.
-
DC vs MI Live Score Updates : बुमराहचा कडक थ्रो, नितीश राणा रन आऊट, दिल्ली दुसरा झटका
जसप्रीत बुमराह याने त्याच्या पहिल्या आणि दिल्लीच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली आहे. बुमराहने त्याच्या बॉलिंगवर नितीश राणा याला नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट केलं. त्यामुळे दिल्लीचा स्कोअर 2 आऊट 7 असा झाला आहे.
-
सुरत- नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार, सात जखमी
सुरत- नागपूर महामार्गावर साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात
क्रुझर गाडी उलटून अपघातात, 2 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती
अपघातामध्ये सात जण जखमी
जखमींना उपचारासाठी साखरे ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले दाखल
-
DC vs MI Live Score Updates : दिल्लीला पहिला झटका, केएल राहुल आऊट
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. दीपक चाहर याने केएल राहुल याला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती 1 धावावेर कॅच आऊट केलं.
-
DC vs MI Live Score Updates : दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान, मुंबई जिंकणार?
दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यातील पहिला डाव आटोपला आहे. मुंबईने दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. मुंबईसाठी कॅप्टन सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर दिल्लीसाठी मुकेश कुमार याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
-
DC vs MI Live Score Updates : मुंबईला सहावा धक्का, नमन धीर आऊट
दिल्लीने मुंबईला सहावा धक्का दिला आहे. सेट नमन धीर आऊट झाला आहे. टी नटराजन याने नमन धीर याला ट्रिस्टन स्टब्स याच्या हाती कॅच आऊट केलं. नमनने 21 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. नमनने या दरम्यान 1 सिक्स आणि 2 फोर लगावले.
-
DC vs MI Live Score Updates : कॅप्टन सूर्या अर्धशतकानंतर आऊट, मुंबईला पाचवा धक्का
लुंगी एन्गिडी याने मुंबई इंडिनय्सला पाचवा आणि सर्वात मोठा झटका दिला आहे. लुंगीने कॅप्टन सूर्यकुमार यादव याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. सूर्याने 36 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. सूर्याने या दरम्यान 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.
-
DC vs MI Live Score Updates : कॅप्टन सूर्याची झुंजार खेळी, दिल्ली विरुद्ध अर्धशतक
कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध निर्णायक क्षणी अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने 35 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह हे अर्धशतक पूर्ण केलं.
-
DC vs MI Live Score Updates : मुंबईला चौथा धक्का, शेरफेन रुदरफोर्ड आऊट, पलटण पुन्हा बॅकफुटवर
दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईला चौथा झटका देत पुन्हा बॅकफुटवर टाकलं आहे. अक्षर पटेल याने रोहित शर्मा याला आऊट केलंं. त्यानंतर विपराज निगम याने शेरफेन रुदरफोर्ड याला मुकेश कुमार याच्या हाती कॅच आऊट केलं. शेरफेन याने 5 धावा केल्या.
-
DC vs MI Live Score Updates : रोहित शर्मा आऊट, मुंबईला तिसरा झटका
दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. अक्षर पटेल याने सेट रोहित शर्मा याला आऊट केलं आहे. रोहितने 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने एकूण 35 धावा केल्या.
-
DC vs MI Live Score Updates : रोहित-सूर्या जोडी जमली, मुंबईचं जोरदार कमबॅक
मुकेश कुमार याने मुंबईला डावातील तिसऱ्या ओव्हरमध्य 2 झटके दिले. मुकेशने रायन रिकेल्टन आणि तिलक वर्मा या दोघांना आऊट केलं. त्यामुळे मुंबईची 2.5 ओव्हरमध्ये 2 आऊट 18 अशी स्थिती झाली. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी मुंबईला 9 ओव्हरपर्यंत 2 आऊट 69 धावांपर्यंत पोहचवलं.
-
DC vs MI Live Score Updates : रायननंतर तिलक वर्मा आऊट, मुकेश कुमारकडून मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
दिल्ली कॅपिट्ल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने मुंबईला तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. मुकेशने आधी तिसऱ्या बॉलवर रायन रिकेल्टन याला अक्षर पटेल याच्या हाती 9 रन्सवर कॅच आऊट केलं. त्यानंतर मुकेशने तिलकला पाचव्या बॉलवर कॅच आऊट केलं. तिलकला भोपळाही फोडता आला नाही.ं
-
DC vs MI Live Score Updates : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट
दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सला पहिला झटका दिला आहे. मुकेश कुमार याने रायन रिकेल्टन याला तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅप्टन अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 9 धावा केल्या.
-
DC vs MI Live Score Updates : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, रोहित-रिकेल्टन मैदानात
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
DC vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (डब्ल्यू), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.
-
DC vs MI Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.
-
DC vs MI Live Updates : दिल्लीने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध निर्णय काय?
दिल्ली कॅपिट्ल्सने मुबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन अक्षर पटेल याने अरुण जेटली स्टेडियममध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
DC vs MI Live Updates : दिल्ली-मुंबई हेड टु हेड रेकॉर्ड्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 37 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी 21 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 16 सामने जिंकले आहेत.
-
DC vs MI Live Updates : दिल्ली कॅपिट्ल्स टीम
पथुम निसांका, नितीश राणा, समीर रिझवी, अक्षर पटेल(कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार, आशुतोष शर्मा, आकिब नबी दार, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, मिचेल स्टार्क, काइल जेमिसन, अजय जाधव मंडल, पृथ्वी शॉ, त्रिपुराण विजय, अभिषेक पोरेल, साहिल पारख आणि माधव तिवारी.
-
DC vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, शार्दुल ठाकुर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, राज बावा, अश्वनी कुमार, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, मिचेल सँटनर, विल जॅक्स, मयंक रावत, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
DC vs MI Live Updates : दिल्ली विरुद्ध मुंबई सामना
आयपीएल 2026 च्या आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 5 वेळा चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
Published On - Apr 04,2026 2:20 PM
