Devendra Fadnavis | मन मोठं करा.. बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले की, “माझी सर्वांना विनंती आहे की ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी. याआधी महाराष्ट्रात काही बिनविरोध पोटनिवडणुका झाल्या आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले की, “माझी सर्वांना विनंती आहे की ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी. याआधी महाराष्ट्रात काही बिनविरोध पोटनिवडणुका झाल्या आहेत. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपने त्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता आणि सर्व पक्षांनी ठरवून निवडणूक बिनविरोध पार पाडली.” मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बारामतीत देखील सर्व पक्षांनी समन्वय करून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा आणि निवडणुकीत गैरसमज टाळावा. त्यांनी या निमित्ताने सर्व पक्षांनी सहकार्य करून शांततापूर्ण आणि बिनविरोध निवडणुकीस हातभार लावावा, असा आवाहन केलं आहे.
दरम्यान, नाशिकच्या अपघातावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका कुटुंबातील 9 जणांची कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीत कोसळून मृत्यू झाला. दरगोडे कुटुंबीय एका खाजगी कार्यक्रमासाठी बाहेर पडले होते, त्यावेळी हा अपघात झाला. विहिर पाण्याने भरलेली होती आणि तिचा कठडा छोटा असल्यामुळे जीवीतहाणी झाली, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत कुटुंबाला मदत जाहीर केली आणि अशा विहिरींचा तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना प्रचंड वेदना देणारी असून भविष्यात अशा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

