AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धातला तो गेम चेंजर क्षण इराणसाठी आलाच, 24 तासात जे दु:ख, वेदना दिल्यात ते अमेरिका कधीच नाही विसरणार

US-Iran Update : एकाच दिवसात अमेरिकेला युद्धातील आपलं सर्वात मोठं नुकसान पहावं लागलं. ज्याचा त्यांनी कधी विचार केला नसेल. इराणने अक्षरश: अमेरिकेला हादरवून सोडलं. अमेरिका-इस्रायलने त्यांना कमी लेखण्याची चूक केली होती.

युद्धातला तो गेम चेंजर क्षण इराणसाठी आलाच, 24 तासात जे दु:ख, वेदना दिल्यात ते अमेरिका कधीच नाही विसरणार
US-Iran
| Updated on: Apr 04, 2026 | 2:44 PM
Share

अमेरिका-इस्रायलने इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धाला आता महिना उलटून गेलाय. 28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने तेहरानवर हल्ला करुन या युद्धाची सुरुवात केली. मागच्या महिन्याभरात अमेरिका-इस्रायलने त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनी इराणच्या वेगवेगळ्या शहरांवर प्रचंड मोठे हल्ले केले. इराणच यात भरपूर नुकसान केलं. पण इराण त्यांच्यासमोर अजूनही ठामपणे उभा आहे. इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने सुद्धा त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराणनेही आखाती देशांच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य केल. परिणामी अमेरिकेला इस्रायलला सांगावा लागलं की, तुम्ही ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले थांबवा. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करुन इराणने दोन्ही देशांना आपली ताकद दाखवून दिली. युद्ध सुरु करण्याआधी अमेरिका-इस्रायलने त्यांना कमी लेखण्याची चूक केली. इराण आपली क्षमता आता दाखवून देत आहे.

अमेरिका शुक्रवारचा दिवस अजिबात विसरणार नाही. युद्धातला हा गेमचेंजर दिवस ठरला. इराणने अमेरिकेसाठी गुड फ्रायडे ब्लॅक डे मध्ये बदलून टाकला. इराणच्या सैन्याला सर्वात मोठं यश कालच्या दिवसात मिळालं. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने अमेरिकेची दोन फायटर जेट्स, पाच ड्रोन आणि मिसाइल्स पाडली. शनिवारी इस्लामिक रिवोल्यूशन गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) इराणच्या अनेक प्रांतात शत्रुची मिसाइल्स, फायटर जेट्स इंटरसेप्ट करुन कशी पाडली? त्या सीरीजची माहिती दिली.

एकाच दिवसात एवढं नुकसान

IRGC च्या एअरोस्पेस युनिटने खोमीन आणि जंजनच्या आकाशात दोन क्रूज मिसाइल्सना हवेतच नष्ट केलं. त्याशिवाय इस्फहानच्या आकाशात दोन MQ-9 रिपर ड्रोन्स पाडले. बुशेहरमध्ये एक हर्मेस ड्रोन नष्ट केलं. त्याशिवाय इराणने अमेरिकेचं सर्वात अत्याधुनिक F-35 फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. पण अजूनपर्यंत या दाव्याची पृष्टी झालेली नाही. एका बेपत्ता वैमानिकाचा शोध सुरु आहे.

‘वॉरहॉग’ म्हणून हे विमान ओळखलं जातं

जेट पाडल्यानंतर पायलटला शोधण्यासाठी आलेलं दुसरं विमान सुद्धा इराणने पाडलं. एक जेट पडल्यानंतर दुसऱ्या विमानावर सुद्धा इराणने हल्ला केला. एका अमेरिकी अधिकाऱ्याने NBC न्यूजला ही माहिती दिली. इराणने आधी F-15 पाडलं. मग अजून एक विमान शोध मोहिमेसाठी आलेलं. त्यावर सुद्धा इराणने हल्ला केला. शोध मोहिमेसाठी A-10 थंडरबोल्ट विमान आलेलं. ‘वॉरहॉग’ म्हणून हे विमान ओळखलं जातं.

एकाच दिवसात अमेरिकेची किती विमानं पाडली?

A-10 कुवैतच्या हवाई क्षेत्रापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलं. तिथे वैमानिक विमानाबाहेर पडला. त्यानंतर विमान कोसळलं. A-10 विमान कुवैतमध्ये पडलं. त्यानंतर दोन UH 60 ब्लॅकहॉक हेलीकॉप्टर्सना सुद्धा इराणने लक्ष्य केलं. एकाच दिवसात इराणने अमेरिकेची दोन सैन्य विमानं F-15, A-10 पाडली. दोन ब्लॅक हॉक हॅलिकॉप्टर्स पडली. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या विजयाची शेखी मिरवत असताना हे सर्व घडलय.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......