AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs MI : केकेआरसमोर मुंबईचं आव्हान, कोलकाता पलटणला पराभूत करणार?

Kolkata Knight Riders vs Mumbai Indian : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. केकेआरकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

KKR vs MI : केकेआरसमोर मुंबईचं आव्हान, कोलकाता पलटणला पराभूत करणार?
Hardik Pandya MI vs KKR IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 20, 2026 | 9:16 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करणार आहे. मुंबई आणि केकेआर या दोन्ही संघांनी 19 व्या हंगामात आतापर्यंत एकूण आणि प्रत्येकी 12 सामने खेळले आहेत. तर बुधवारी होणारा दोन्ही संघांचा 13 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. मुंबई या हंगामातून बाहेर झाली आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी मुंबईला विशेष फरक पडणार नाही. मात्र केकेआर प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. केकेआरचं प्लेऑफमधील आव्हान स्वत:च्या हातात नाही. मात्र त्यांना प्लेऑफची शक्यता आहे. त्यामुळे केकेआर पलटण विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केकेआर पराभवाचा हिशोब करणार का?

केकेआर आणि मुंबई दोन्ही संघांनी 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्ध केली होती. उभयसंघातील हा सामना 29 मार्च रोजी खेळवण्यात आला होता. मुंबईने घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केकेआरवर एकतर्फी फरकाने मात करत 2012 नंतर आपला पहिला सामना जिंकला होता. केकेआरने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं.

केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

आता उभयसंघातील सामना हा केकेआरच्या घरच्या मैदानात इडन गार्डन्समध्ये होणार आहे. त्यामुळे केकेआर पलटणला लोळवून विजय मिळवून हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, केकेआर-मुंबई अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत. केकेआरने 12 पैकी 5 सामने जिंकलेत. केकेआरला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर कोलकाताचा पंजाब किंग्स विरुद्धचा 1 सामना हा पावसाने वाया गेला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला होता. केकेआरच्या खात्यात एकूण 11 गुण आहेत. तर मुंबईने 12 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर पलटणने 8 सामने गमावले आहेत. मुंबईच्या नावावर 8 गुण आहेत. आता उभयसंघात होणाऱ्या 13 वा सामन्यात कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...