AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli News : ‘काका, मला मारू नका…’; रमेश म्हात्रेंच्या मारहाणीनंतर पीडित डॉक्टरला मानसिक धक्का, वडिलांची कठोर कारवाईची मागणी

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील हल्ल्याने डॉक्टर मानसिक धक्क्यात आहेत. वडील महेंद्र बाविस्कर यांनी मुलीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना सुरक्षा मिळावी, जेणेकरून तरुण डॉक्टर भीतीशिवाय सेवा देऊ शकतील, असेही त्यांनी म्हटले आहे. हा हल्ला निषेधार्ह असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कारवाई आवश्यक आहे.

Dombivli News : ‘काका, मला मारू नका...’; रमेश म्हात्रेंच्या मारहाणीनंतर पीडित डॉक्टरला मानसिक धक्का, वडिलांची कठोर कारवाईची मागणी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीने खळबळ उडाली
| Updated on: Jul 11, 2026 | 9:23 AM
Share

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी मुलीच्या मानसिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांचे वडील आणि व्यावसायिक डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी सांगितलं की, हल्ल्यानंतर सृष्टी अजूनही गंभीर मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही. झोपेतून दचकून उठत ती “काका, मला मारू नका… ते मला मारतील,” असे म्हणत घाबरते. या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला असून पुन्हा रुग्णालयात कामावर जाण्याबाबतही तिच्या मनात भीती निर्माण झाली आहे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना राजकीय संरक्षण न देता कठोर शिक्षा करावी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुलगी अजूनही दहशतीत

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य तीन आरोपींना न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त करताना जखमी डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांचे वडील आणि व्यावसायिक डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी आपल्या मुलीची मानसिक अवस्था उघड केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सृष्टी अजूनही प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. झोपेतून अचानक उठून “काका, मला मारू नका… ते मला मारतील” असे म्हणत ती घाबरून बसते. या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला असून रुग्णालयात पुन्हा कामावर जाण्याबाबतही तिच्या मनात दहशत आहे.

सृष्टीने वाडिया आणि अन्य मोठ्या रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर समाजसेवेच्या भावनेतून शास्त्रीनगर रुग्णालयात सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रुजू होऊन अवघा एक महिना होत असतानाच तिच्यावर हल्ला झाला. सरकारी रुग्णालये ही गोरगरिबांची जीवनवाहिनी आहेत. अशा ठिकाणी डॉक्टरांवरच हल्ले होत असतील तर तरुण डॉक्टर सरकारी सेवेत येण्यास घाबरतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ही मारहाण गरिबांसाठी झाली नाही तर नगरसेवक सोबत असलेल्या गुन्हेगारांच्या कुटुंबाला उपचार मिळाला नाही म्हणून त्या मारहाण केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करा

तसेच जी महिला उपचार घेण्यासाठी आली होती तिचा भाऊ गुन्हेगार आहे. त्यामुळे आपल्या गुन्हेगार साथीदारासाठी ही मारहाण केली डॉक्टरांबाबत तक्रार असल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करावी, मात्र मारहाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्रालयाकडे डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी करताना त्यांनी डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपींना कडक शिक्षा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ