भारत परदेशातून सोने का मागवत आहे ? सोन्याच्या किंमतीवर याचा परिणाम होणार का ?
भारतीय रिझर्व्ह बँकेने अलिकडेच विदेशातून ६०.०८ टन सोने परत मागवले आहे. त्यामागे नेमके कारण काय आहे ? याचा सोन्याच्या किंमतीवर काय परिणाम होणार आहे ?

RBI Gold Reserves: भारतीय रिझर्व्ह बँक आपले परदेशात ठेवलेले सोने देशात आणत आहे. या पावलाने केंद्रिय बँक आपल्या संपत्तीवर नियंत्रण वाढवत आहे. आणि परदेशी संस्थांवरील अवलंबित्व कमी होत असते. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी आरबीआयच्या बातमीनुसार एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ६०.०८ल टन सोने भारतात आणले गेले आहे. देशाच्या ८८०.५२ टन सुवर्ण भंडारापैकी आता ७४०.१३ टन सोने देशाच्या आत आणले आहे. उर्वरित १४०.३९ टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या जवळ ठेवले आहे.
आरबीआय आपले सोने भारतात का आणतेय ?
याचे एक कारण निर्बंधांची जोखीम आणि भौगोलिक तणाव असू शकतो. साल २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन संघर्ष सुरु झाल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियातील केंद्रीय बँकेच्या परदेशी संपत्तीचा एक भाग फ्रीज केला होता. या घटनेनंतर जगभरातील केंद्रिय बँकांनी आपआपल्या विदेशी भंडारांची सुरक्षा आणि त्याच्यापर्यंत पोहचण्यासठी लक्ष पुरवणे सुरु केले आहे. देशाच्या आत सोने ठेवल्याने परदेशी संस्थांवरील निर्भरता कमी होते. मात्र, आरबीआयने अधिकृतपणे याच्या कारणांचा उल्लेख केलेला नाही.
भारतात सोने ठेवल्याने आरबीआयचे त्यांच्या साठ्यावर फिजिकट कंट्रोल रहाते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संकट किंवा वाढत्या तणावर यामुळे परदेसी संस्थांवरील परिचाल संबंधीत अवलंबित्व कमी होऊ सकते. मात्र, परदेशात ठेवलेले सोने देखील आरबीआयचीच संपत्ती असते.
भारतात सोने सुरक्षित रुपाने ठेवण्यासाठी आवश्यक तिजोरीच्या पायाभूत सुविधा आहेत. याच मुळे केंद्रिय बँक आपल्या साठ्याचा एक मोठ्या भाग देशाच्या आत ठेवू शकत आहे.
सोन्याची किंमत वाढेल की कमी होईल ?
सोन्याचा साठा भारतात आणल्याने बाजाराच्या किंमतीवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान आरबीआयने ६०.०८ टन सोने घरगुती भंडारात ठेवले आहे. परंतू भारताचा एकूण सुवर्णसाठी ८८०.५२ टनावरच राहिला आहे.हा केवळ उपलब्ध सोन्याच्या साठवणूकीच्या जागेतील बदल होतो, बाजारातून केलेली नवीन खरेदी नाही.
या कारणाने जागा बदलल्याने सोन्याच्या बाजारातील मागणी कोणत्याही प्रकारे वाढ होते ना सध्याच्या पुरवठ्या कोणताही कमकरता होते. भारतात सोन्याच्या किंमत आंतराष्ट्रीय सोन्याचे बाव , अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत, आयात शुल्क आणि घरगुती मागणीने प्रभावित होते. अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची मजबूती, जागतिक महागाई आणि भू-राजकीय तणावाच्या किंमतीवर परिणाम टाकत आहेत.
