AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! कुत्र्याला घाबरून जोरात पळाला, 18 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. त्यावेळी हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

धक्कादायक! कुत्र्याला घाबरून जोरात पळाला, 18 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू
badlapur dog bite newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 7:54 PM
Share

Badlapur News :  रस्त्यावरील भटके कुत्रे सर्वांसाठीच डोकेदुखीचं कारण बनलेले आहेत. अशा कुत्र्यांनी अनेक लोकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा कुत्र्यांवर नियंत्रण मिळवावे, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नेहमीच केली जाते. एकीकडे हा प्रश्न कायम असताना दुसरीकडे बदलापुरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. भटक्या कुत्र्यापासून बचाव करून पळणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली.

हर्षल शिंदे असं तरुणाचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. त्यावेळी हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

कुत्र्याला घाबरून मुलगा जोळात पळाला

हर्षलवर 3 वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून खूप जोरात पळाल्यामुळे हृदयावर ताण येऊन त्याला अटॅक आला, अशी माहिती बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. मात्र या संतापजनक घटनेने बदलापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पालिका प्रशासनानंही याची दखल घेत लवकरात लवकरत भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून बदलापूरकरांची सुटका करू असं आश्वासन नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिलं.

बदलापुरात एकूण 15 हजारेपक्षा जास्त कुत्रे

बदलापूर शहरात आज घडीला 15 हजार कुत्रे असल्याची माहिती समोर आली. कुत्र्यांच्या हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडतायत. पालिकेनं डॉग शेल्टरच्या माध्यमातून उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी ही समस्या एका दिवसात सुटणं शक्य नाही. यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. मात्र तोपर्यंत किती जणांना अशा घटनांना सामोरे जावे लागते असाच प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?