AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs MI Live Streaming : कोलकातासाठी निर्णायक सामना, मुंबई विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians IPL 2026 Live Scorecard : कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर कोणत्याही स्थितीत मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना अतिशय निर्णायक ठरणार आहे.

KKR vs MI Live Streaming : कोलकातासाठी निर्णायक सामना, मुंबई विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?
KKR vs MI IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 19, 2026 | 11:00 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघात आमनासामना होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना होणार आहे. सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 13 वा सामना असणार आहे. मुंबईचं या हंगामातून पॅकअप झालंय. तर केकेआरच्या प्लेऑफच्या आशा कायम आहत. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना बुधवारी 20 मे रोजी होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना इडन्स गार्डन्समध्ये होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स विरु्द्ध सरस राहिली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 36 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने या 36 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. मुंबईने केकेआर विरुद्ध 36 पैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.  तर केकेआरने मुंबईवर 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता बुधवारी होणार सामना कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...