AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ, नेमकी भानगड काय?

राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ, नेमकी भानगड काय?

| Updated on: May 19, 2026 | 2:02 PM
Share

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा पार पडला. युरोपमधील नॉर्वेमध्ये पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या मुक्त पत्रकार हेल लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माध्यम स्वातंत्र्यावरून प्रश्न विचारला होता. दरम्यान, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या प्रेस ब्रिफिंगनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा पार पडला. युरोपमधील नॉर्वेमध्ये पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या मुक्त पत्रकार हेल लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माध्यम स्वातंत्र्यावरून प्रश्न विचारला होता. दरम्यान, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या प्रेस ब्रिफिंगनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नाच्या मुद्द्याला धरून एका महिला पत्रकाराने ‘भारतावर आम्ही विश्वास का ठेवावा? भारतात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाला रोखण्याचं आश्वासन देऊ शकता का? भारतीय पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतील का?’ असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सडेतोड उत्तर दिलं.

मात्र, या दरम्यान एक घटना घडली. ज्या पत्रकार महिलेने हा प्रश्न विचारला होता, तिने ट्विटर पोस्ट करून सांगितलं की, ‘मला भारतातील पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नव्हती. नॉर्वेसारख्या देशात येऊन ते पत्रकारांसमोर बोलले नाहीत.’ यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही एक पोस्ट करत सांगितलं की, ‘पंतप्रधानांनी प्रश्नाचं उत्तर न देता पळ काढला.’ पुढे ते म्हणाले, ‘हे देशासाठी किती लाजिरवाणं आहे.’

Published on: May 19, 2026 02:02 PM
Follow Us