Bandra | रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात बुलडोझरची कारवाई
मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली असून, गरीब नगर परिसरात मोठ्या प्रमाणात बुलडोझर कारवाई सुरू आहे.

या मोहिमेसाठी सहा बुलडोझर आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची प्रक्रिया सुरू असताना स्थानिक नागरिक मात्र आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. घरांवर कारवाई होत असल्यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करत आक्रोश केला.
स्थानिकांच्या मते, अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे या परिसरात राहत असून अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांच्यासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Published on: May 19, 2026 02:42 PM
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र