AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : 10 सिक्स-7 फोर, वैभवची तुफानी खेळी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड ब्रेक

Most sixes in an IPL season : वैभव सूर्यवंशी याने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. वैभवने एका झटक्यात आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल या दोघांना मागे टाकलं आहे.

Vaibhav Sooryavanshi : 10 सिक्स-7 फोर, वैभवची तुफानी खेळी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड ब्रेक
Vaibhav Sooryavanshi RR IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 19, 2026 | 11:30 PM
Share

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मंगळवारी 19 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 64 व्या सामन्यात ट्रेडमार्क खेळी केली. वैभवने लखनौ विरुद्ध 221 धावांचा पाठलाग करताना चाबूक खेळी केली. वैभवची नेहमीपेक्षा संथ सुरुवात झाली. मात्र त्यानंतर वैभवने गिअर बदलला. वैभवने 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं. वैभवचं आयपीएल कारकीर्दीतील हे सर्वात संथ अर्धशतक ठरलं. त्यानंतर वैभवने आणखी वेगात धावा केल्या. त्यामुळे वैभव शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. त्यामुळे वैभव या हंगामातील दुसरं आणि एकूण तिसरं शतक ठोकणार होता. मात्र वैभवचं शतक हे अवघ्या 7 धावांनी हुकलं. मात्र वैभवने या दरम्यान मोठा विक्रम मोडीत काढला.

वैभवची वादळी खेळी आणि महारेकॉर्ड ब्रेक

वैभवने लखनौ विरुद्ध 38 चेंडूत 93 धावा केल्या. वैभवने या खेळीत नेहमीप्रमाणे चौकार कमी आणि षटकार जास्त खेचले. वैभवने षटकार आणि चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. वैभवने या खेळीत 10 षटकार आणि 7 चौकार लगावले. वैभवने यासह आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल या दोघांना एका मोसमात सर्वाधिक षटकार लगावण्याबाबत मागे टाकलं.

वैभवने 10 षटकार लगावून 19 व्या मोसमात 53 षटकार पूर्ण केलं. वैभवने यासह आंद्रे रसेल याचा 52 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रसेलने 2019 साली सर्वाधिक 52 षटकार लगावले होते. तर ख्रिस गेल याने 2013 साली सर्वाधिक 51 षटकार लगावले होते. तसेच एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर कायम आहे. मात्र वैभवला हा विक्रमही मोडीत काढण्याची संधी आहे.

ख्रिस गेल याने 2012 साली आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक 59 षटकार लगावले होते. गेलचा हा विक्रम अजूनही कायम आहे. मात्र वैभव हा विक्रम मोडीत काढू शकतो. त्यासाठी वैभवला आणखी 7 षटकारांची गरज आहे. राजस्थानचा 19 व्या हंगामात साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना हा 24 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी वैभवला या सामन्यात 7 सिक्स खेचावे लागणार आहेत. त्यामुळे वैभव मुंबई विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एका हंगामात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

  1. ख्रिस गेल : 59 सिक्स, 2012
  2. वैभव सूर्यवंशी : 53 सिक्स, 2026
  3. आंद्रे रसेल, 52 सिक्स,2019
  4. ख्रिस गेल, 51 सिक्स, 2013
  5. जोस बटलर, 45 सिक्स, 2022
  6. ख्रिस गेल, 44 सिक्स, 2011
  7. अभिषेक शर्मा, 42 सिक्स, 2024

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...