AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीत रोज साबुदाणा खाताय? शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम, जाणून घ्या

Navratri Fasting Tips: नवरात्रीच्या उपवासात बहुतांश लोक साबुदाणा खातात. पण रोज साबुदाणा खाल्ल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? याबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

नवरात्रीत रोज साबुदाणा खाताय? शरीरावर होऊ शकतात 'हे' परिणाम, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Oct 14, 2026 | 2:15 PM
Share

शारदीय नवरात्री सुरू झाली असून, ९ दिवसांच्या उपवासाच्या काळात बहुतांश लोकांचा साबुदाणा खाण्याकडे कल असतो. केवळ साबुदाण्याची खिचडी, खीर नाही तर साबुदाण्यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांच्या रेसिपी सोशल मीडियावर उपलब्ध असतात. बरीच लोकं दररोज संध्याकाळच्या फराळासाठी साबुदाणा खातात. तुम्हाला माहित आहे का साबुदाणा म्हणजे काय? तो कसा बनवला जातो, त्यात पोषक तत्वे असतात की नाही आणि दररोज त्याचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

साबुदाणा म्हणजे फक्त स्टार्च, बाकी काही नाही

रायपूरमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयेश शर्मा यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितले की, साबुदाणा हे नवरात्रीत खाल्ले जाणारे एक मुख्य अन्न आहे. तो चवीला स्वादिष्ट असला तरी, त्यावर खूप प्रक्रिया केलेली असते आणि तो शुद्ध स्टार्च असतो, जो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. तसेच, तो स्थानिक नाही. कारण ज्या मुळापासून तो बनवला जातो, ती टॅपिओका वनस्पती प्रामुख्याने ब्राझीलमध्ये उगवते.

साबुदाण्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते

कृष अशोक हे अन्नाबद्दलची वैज्ञानिक तथ्ये सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी एका व्हिडिओत सांगितले की, साबुदाणा चविष्ट असल्यामुळे त्यांनाही आवडतो, पण तो एक अति-प्रक्रिया केलेला पदार्थ आहे आणि त्यात स्टार्च शिवाय दुसरे काहीही नाही. जर तुम्ही उपवासात तो खात असाल, तर तुम्ही अशा कर्बोदकांचे सेवन करत आहात ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. बोबा आणि बलल टीमध्ये देखील सेम स्टार्च वापरले जाते.

उपवास दरम्यान काय खावे? डॉ. जयेश शर्मा म्हणतात की, साबुदाणा व्यतिरिक्त, आपण करत असलेली दुसरी सामान्य चूक म्हणजे अति खाणे. उपवासाला ‘फलाहार’ म्हणतात, ज्यामध्ये फक्त फळे खाणे अपेक्षित असते. पण आपण सोपे मार्ग शोधले आहेत. उपवासाच्या काळात राजगिरा किंवा कुट्टू खावे. त्यामध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने ते धान्यांपेक्षा एक चांगला पर्याय ठरतात. याव्यतिरिक्त, सुकामेवा (बदाम, अक्रोड, काजू इत्यादी) आणि बियांचे सेवन करावे. थोडे दही किंवा ताक प्यावे.

कसा बनवला जातो साबुदाणा?

साबुदाणा प्रामुख्याने टॅपिओका मुळापासून बनवला जातो, ज्याला कसावा असेही म्हणतात. ही मुळे मोठ्या रताळ्यासारखी दिसतात. कारखान्यांमध्ये ती धुतल्यानंतर, त्यांची बाहेरील तपकिरी साल काढली जाते, ज्यामुळे आतून ती पूर्णपणे पांढरी राहतात. त्यांची पेस्ट बनवल्यानंतर, ती पाण्यात विरघळवून तंतू वेगळे करण्यासाठी गाळली जाते, ज्यामुळे फक्त पांढरा स्टार्च शिल्लक राहतो. नंतर तो वाळवून त्याचे दाणे बनवले जातात. त्यानंतर त्यांना पॉलिश करून पॅक केले जाते.

Follow Us
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान