AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंबू आणि संत्र्याचा आहारात समावेश करा, सुंदर त्वचा आणि चमकदार केस मिळवा!

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण निरोगी राहतो.

लिंबू आणि संत्र्याचा आहारात समावेश करा, सुंदर त्वचा आणि चमकदार केस मिळवा!
सुंदर चेहरा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 06, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण निरोगी राहतो. दररोज जर आपण आहारात फळांचा समावेश केला तर अनेक रोगही आपल्यापासून दूर राहतात. मात्र, फळांचे फक्त एवढेच फायदे नसून. (Lemon, orange is beneficial for skin and hair)

आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये लिंबू आणि संत्र्याचा समावेश केला तर आपली त्वचा आणि केसही सुंदर होण्यास मदत होते. लिंबू आणि संत्र्यामध्ये लोह भरपूर असते. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे केसांसाठी फायदेशीर आहे. कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे जे केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे पेशींची वाढ होते. या हंगामात केसांची काळजी घेण्यासाठी, आपण आपल्या आहारात संत्रा किंवा लिंबू समाविष्ट करू शकता.

पावसाळ्यात चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा फेसपॅक वापरू शकतो. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि चार चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि बेसन पीठाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि सहा चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण दहा मिनिटांसाठी फ्रीमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Lemon, orange is beneficial for skin and hair)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली