Datura Benefits | पुरुषांनो केस गळतायत? टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग, ‘धोत्रा’ ठरेल तुमच्यासाठी वरदान! वाचा याचे फायदे…

देवी भागवत पुराणात असे म्हटले आहे की, विषग्रहण केल्यानंतर अश्विनीकुमारांनी भांग, धोत्रा, बेल इत्यादीपासून महादेवाची व्याकुळता दूर केली होती. आयुर्वेदानुसार, धोत्र्यामधील विद्यमान औषधी गुणधर्म जखमेचे संरक्षण आणि शारीरिक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

Datura Benefits | पुरुषांनो केस गळतायत? टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग, ‘धोत्रा’ ठरेल तुमच्यासाठी वरदान! वाचा याचे फायदे...
धोत्रा
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 9:18 AM

मुंबई : भगवान शिव यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांना ‘धतुरा’ अर्थात ‘धोत्रा’ अर्पण करण्यात येतो. भोलेनाथ यांना धोत्रा खूप आवडतो, असे म्हटले जाते. शरीरावर भस्म लावणाऱ्या बैरागी भगवान शिवाला ‘धोत्रा’ अर्पण केल्याने सर्व दु:खापासून मुक्ती मिळते. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का की, शिवजींची ही प्रिय गोष्ट केवळ भगवान महादेवाला संतुष्ट करण्यासाठी किंवा आपली दुःख दूर करण्यासाठी नव्हे, तर अनेक आजारांना बरे करण्यासाठी देखील ‘धोत्र्या’चा वापर केला जातो (Know the amazing remedies using datura will be helpful to prevent hair loss).

भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात. हा भाग अतिशय थंड आहे, जेथे शरीराला उष्णता देणारे अन्न आणि औषधाची आवश्यकता भासते. वैज्ञानिकदृष्ट्या, जर धोत्रा मर्यादित प्रमाणात घेतला गेला, तर तो एक औषध म्हणून काम करतो आणि शरीराला आतून गरम ठेवतो. देवी भागवत पुराणात असे म्हटले आहे की, विषग्रहण केल्यानंतर अश्विनीकुमारांनी भांग, धोत्रा, बेल इत्यादीपासून महादेवाची व्याकुळता दूर केली होती. आयुर्वेदानुसार, धोत्र्यामधील विद्यमान औषधी गुणधर्म जखमेचे संरक्षण आणि शारीरिक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

पुरुषांच्या शारीरिक क्षमतेसाठी वरदान

पुरुषांसाठी धोत्रा सेवन करणे हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे त्यांची शारीरिक शक्ती वाढते. त्याचे सेवन करण्यासाठी लवंगा व धोत्र्याच्या बिया बारीक वाटून घ्या. यानंतर त्यात मध घालून लहान गोळ्या बनवा. दररोज सकाळी एक गोळी सेवन करा, आपणास काही दिवसांत बदल जाणवेल.

सांधेदुखी आणि सुजेवर फायदेशीर

सांधेदुखीमध्येही धोत्रा वापरला जाऊ शकतो. तसेच, पायात सूज किंवा पाय जड वाटत असल्यास आपण धोत्रा वापरू शकता. यासाठी धोत्र्याची पाने बारीक करून त्याचा लेप लावावा. हा लेप आपल्याला त्वरित आराम देईल. कारण, धोत्रा नैसर्गिकरित्या उष्ण असल्यामुळे स्नायूंना उबदार ठेवतो आणि स्नायू मऊ होतात. ज्यामुळे रुग्णाला त्वरित दिलासा मिळतो.

टक्कल पडण्याच्या समस्येवर प्रभावी

टक्कल पडलेल्या लोकांना धोत्र्याचा रस बाधित भागावर लावावा. त्याच्या रसात विशेष गुणधर्म आहेत, ज्यामुळे सेबम निरोगी होतो आणि टक्कल पडण्याची समस्या प्रतिबंधित होते. धोत्र्याचा रस तिळाच्या तेलात मिसळून लावल्यास लवकर फायदा दिसून येतो (Know the amazing remedies using datura will be helpful to prevent hair loss).

जखम आणि घावांवर उपयोगी

जर, तुमच्या शरीरावर खोल जखमा किंवा घाव असतील, तर तुम्ही त्यास धोत्र्याच्या सहाय्याने बरे करू शकता. आपण याला अँटी-सेप्टिक औषध म्हणून देखील वापरू शकता, जेणेकरून कोणतीही जखम लवकर बरी होईल. तथापि, हे गंभीर जखमांवर वापरू नये, हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण, याचा वापर केवळ त्वचेच्या वरच्या आवरणावरच करता येतो.

कान दुखीवर प्रभावी

कान दुखणे आणि सूज येणे या समस्येतही आपण धोत्रा वापरू शकता. धोत्र्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत. या कारणास्तव, ते कानदुखीची समस्या कमी करतात.

दम्याच्या तक्रारी

ज्यांना दमा आहे त्यांच्यासाठी देखील धोत्रा फायदेशीर आहे. याचा उपयोग करण्यासाठी धोत्र्याला अपामार्ग व जवस या वनस्पतींमध्ये मिसळून चूर्ण बनवा. आता दररोज या चूर्णाचा वास घेण्याने दम्याची समस्या कमी होईल.

हे लक्षात ठेवा!

धोत्र्याचा प्रभाव खूपच गरम आहे. जर आपण धोत्र्याचे सेवन मर्यादित प्रमाणात केले, तर ते एक प्रकारचे औषध आहे. परंतु, आपण चुकून त्याचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. धोत्र्यामध्ये काही विषारी घटक आढळले आहेत, जे मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. म्हणून, आपण ते वापरणे टाळावे. वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्याव. धोत्रा खाण्यात अजिबात वापरू नये. हे प्राणघातक देखील असू शकते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Know the amazing remedies using datura will be helpful to prevent hair loss)

हेही वाचा :

Sweating | अति घाम येतोय? उन्हाळा समजून दुर्लक्ष करू नका, असू शकते अनेक गंभीर आजारांचे लक्षण!

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात, मग आजच आहारामध्ये बडीशेपचा समावेश करा

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.