उन्हाळ्यात लिचीचीपासून बनवलेले ‘हे’ 5 पदार्थ तुम्हाला देतील चव आणि थंडावा

उन्हाळा सुरू होताच बाजारपेठेत हंगामी फळं विक्रीसाठी उपलब्ध होतात. तर उन्हाळ्यातील हंगामी फळांमध्ये लिची देखील असे फळं आहे जे चविष्ट आणि पाण्याने भरपूर असतात, आणि त्या केवळ शरीराला थंडावा देतात. तर याच लिची फळापासून काही चविष्ट आणि अप्रतिम 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊयात जी खाताच चव व थंडाव्याचा आनंद तुम्हाला मिळेल.

उन्हाळ्यात लिचीचीपासून बनवलेले हे 5 पदार्थ तुम्हाला देतील चव आणि थंडावा
| Edited By: | Updated on: May 17, 2026 | 5:54 PM

उन्हाळा सुरू झाला की बाजारपेठा रसरशीत आणि गोड लिचींनी भरून जातात. चवीला अतुलनीय आणि पाण्याने समृद्ध असलेली लिची केवळ शरीराला थंडावाच देत नाही, तर ताजेपणा आणि ऊर्जेची भावना देखील देते. बहुतेक लोकं ती थेट खाणे पसंत करत असले तरी, लिचीचा वापर विविध प्रकारचे चविष्ट आणि ताजेतवाने करणारे पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. जर तुम्ही या उन्हाळ्यात लिचीपासून काहीतरी नवीन पदार्थ करून पाहू इच्छित असाल, तर लिचीच्या या 5 रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग आजच्या लेखात आपण लिचीपासून कोणते पदार्थ बनवता येतील ते जाणून घेऊयात.

लिची शेक: उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी थंडगार लिची शेक पिणे हा एक अनोखा आणि आनंददायक अनुभव असतो. तर लिचीचा शेक बनवण्यासाठी मिक्सरमध्ये लिचीचा गर, थंड दूध, साखर आणि बर्फ एकत्र वाटून घ्या. सर्व्ह करण्यापूर्वी सुक्या मेव्याने सजवा. चविष्ट असण्यासोबतच यातून भरपूर ऊर्जा देखील मिळते.

लिची मॉकटेल: लिची मॉकटेल् हे नक्कीच सर्वांचे आवडते पेय आहे. तर हे लिची मॉकटेल बनवण्यासाठ लिचीचा गर, सोडा, पुदिना आणि बर्फ एकत्र करून बनवले जाते. याची ताजेतवाने करणारी चव तुम्हाला त्वरित ताजेतवाने आणि उत्साही करते.

लिची आईस्क्रीम: तुम्ही घरी सहज बनवता येणारी आईस्क्रीमची रेसिपी शोधत असाल, तर लिची हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त लिचीचा गर, क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र मिक्स करा आणि नंतर हे मिश्रण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काही तासांनंतर तुमचे चविष्ट आणिथ्‍ थंडगार लिची आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होईल.

लिची कस्टर्ड: लिची कस्टर्ड हा एक हलका आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. व्हॅनिला कस्टर्डमध्ये लिचीचे कापलेले तुकडे मिक्स करा. आता हे मिश्रण थंड करा आणि सर्व्ह करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात इतर फळे देखील मिक्स करू शकता.

लिची जेली: मुलांना लिची जेली खूप आवडते. ती घरी सहज बनवता येते. यासाठी लिचीच्या रसात जिलेटीन किंवा अगर-अगर मिक्स करा. आणि फ्रिजमध्ये काही तास ठेवा. त्यानंतर होममेड लिची जेली खायला तयार आहे. उन्हाळ्यात थंडगार लिची जेली हा एक उत्तम गोड पदार्थ ठरतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us