AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळा आहे की ऑफिस…! वॉशरुम जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी हवीच… कंपनीच्या जाचाला कंटाळलेली IT Engineer महिला पोलीस स्थानकात पोहोचली अन्

IT Company Female Engineer Dismissal Case: आज पाहायला गेलं तर, वर्क कल्चर पूर्णपणे बदलत आहे. ज्यामुळे कर्मचारी कायम तणावाखाली असतात. आता देखील असंच काही झालं आहे. कंपनीत होणाऱ्या जाचाला कंटाळून एका महिलीने थेट पोलीस स्थानक गाठलं...

शाळा आहे की ऑफिस...! वॉशरुम जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी हवीच... कंपनीच्या जाचाला कंटाळलेली IT Engineer महिला पोलीस स्थानकात पोहोचली अन्
IT Company
| Updated on: Jul 26, 2026 | 1:50 PM
Share

IT Company Female Engineer Dismissal Case: आजच्या धकधकत्या जीवनात आयुष्य प्रचंड फास्ट झालं आहे.अशात अनेक चांगले वाईट अनुभव व्यक्ती अनुभवत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून आयटी सेक्टरमध्ये घटत असलेल्या घटनांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आता देखील असंच काही घडलं आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे हक्क, कामाची संस्कृती आणि कामा व वैयक्तिक आयुष्यातील समतोल यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हैदराबादमधील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने, कंपनीच्या व्यवस्थापनावर छळवणूक, अन्यायकारक वागणूक आणि आजारपणाच्या कारणास्तव अचानक नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप करत डुंडीगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर तिने कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली.

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोग्याच्या कारणास्तव रजा घेताना महिनेने पूर्वसूचना दिली होती आणि सर्व वैद्यकीय रिपोर्ट देखील सादर केले होते, तरीही कंपनीचा दृष्टिकोन नकारात्मक होता. महिलेला डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला, तरी देखील कंपनीतील अधिकारी, सतत महिलेला फोन आणि मेल करत पुन्हा कधी कामावर रुजू होणार… असा दबाव टाकत होते…

यानंतर जेव्हा महिलेच्या बाळाची अचानक तब्येत बिघडली, तेव्हा देखील महिलेला ऑफिसमध्ये जाणं शक्य झालं नाही. तेव्हा मॅनेजरने तर सर्व मर्यादा ओलांडल्या. महिलेला कोणतीच पूर्व सूचना न देता किंवा कोणतच स्पष्टीकरण न देता तिला थेट नोकरीवर काढण्यात आलं. त्यानंतर महिलेने पोलीस स्थानकात जात कंपनीवर गंभीर आरोप केले.

महिलेने आयटी कंपन्यांच्या कार्यपद्धती आणि नियमांबाबत तीव्र असमाधान व्यक्त केलं. या महिलेने गंभीर आरोप केला आहे की, कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांना वॉशरुम वापरण्यासाठीही परवानगी घ्यावी लागत असे. ही पद्धत त्यांच्या आत्मसन्मानाचे थेट उल्लंघन करणारी आहे. महिलेने असं देखील सांगितलं की, कर्मचाऱ्यांना अशी वागणूक मिळते… असं आजपर्यंत दुसरीकडे कुठेच पाहिलं नाही.

सांगायचं झालं तर, आजच्या महिलांवर दुहेरी जबाबदाऱ्या आहेत. महिलांना ऑफिस, घर, कुटुंब सर्वांची जबाबदारी सांभाळावी लागते… अशात कंपनीने महिलांसोबत संवेदनशील दृष्टीकोन ठेवावा… प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तर या प्रकरणावर कंपनीची कोणतीच प्रतिक्रिया अद्यार समोर आलेली नाही.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप