AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : उन्हाळ्यात त्वचेची समस्या दूर करण्यासाठी घरी तयार करा ‘आंब्याचा फेसपॅक’

आंबा जवळपास सर्वांनाच खायला आवडतो. अनेकजण आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहतात.

Beauty Tips : उन्हाळ्यात त्वचेची समस्या दूर करण्यासाठी घरी तयार करा 'आंब्याचा फेसपॅक'
आंब्याचा फेसपॅक
| Updated on: May 09, 2021 | 4:26 PM
Share

मुंबई : आंबा जवळपास सर्वांनाच खायला आवडतो. अनेकजण आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहतात. आंबा खाण्यासाठी जेवढा चवदार आहे, त्यापेक्षाही जास्त तो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, आंबा आपल्या त्वचेसाठी देखील खूप चांगला आहे. आंबा चेहऱ्याला लावल्याने आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Mango face pack beneficial for face)

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी आंब्यात व्हिटॅमिन ए असते जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचे मध एक चमचे आंब्याचा रस लागणार आहे, हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होईल.

टॅनिंग दूर होते उन्हाळ्यात बहुतेक लोक टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असतात. टॅनिंग काढून टाकण्यासाठी एक चमचा आंब्याचा रस, एक चमचे बेसन पीठ, दोन चमचे मध घ्या. या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा. आपण हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकतो. याचा परिणाम एका आठवड्यात तुम्हाला दिसेल.

मुरुमाची समस्या दूर उन्हाळ्यात त्वचा अधिक तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. आंबा त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी परिपूर्ण आहे. हे सामान्य त्वचेचे अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. मध, दही आणि आंब्याचा रस एकत्र करून फेसपॅक बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटाने चेहरा पाण्याने धुवा.

एक्सफोलिएट मृत त्वचा काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आंबा स्क्रब बनवा. त्यासाठी आंब्याचा रस, एक चमचे मध, एक चमचे तांदळाचे पीठ, एक चमचे दूध मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटानंतर हाताने चेहरा चोळा आणि पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

(Mango face pack beneficial for face)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली