AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nita Ambani : मोठ्या मुलाने नीता अंबानींना स्पष्टच सांगितलंय, ‘मुलांची आजी आहेस, आजीच राहा आणि कधीच…’

Nita Ambani : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये रंगत असतात. एवढंच नाही तर, नीता अंबानी देखील स्वतःबद्दल आणि कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात.

Nita Ambani : मोठ्या मुलाने नीता अंबानींना स्पष्टच सांगितलंय, 'मुलांची आजी आहेस, आजीच राहा आणि कधीच...'
Nita Ambani
| Updated on: Jul 14, 2026 | 3:01 PM
Share

Nita Ambani : भारतातील सर्वात प्रभावशाली महिला आणि जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या कुटुंबियांसोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगतात. अंबानी कुटुंबियांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अनेक मुलाखतींमध्ये नीता अंबानी त्यांच्या कुटुंबियांबद्दल देखील सांगत असतात. सांगायचं झालं तर, नीता अंबानी यांनी फक्त प्रोफेशनल आयुष्यामध्ये नाही खसागी आयुष्यात देखील अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. पत्नी, आई आणि आता सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आजीची भूमिका नीता अंबानी यांच्या खांद्यावर आहे. नीता अंबानी कुटुंबातील चार चिमुकले पृथ्‍वी, कृष्‍णा, आदिया आणि वेदा यांच्या आजी आहे.

एका मॅगझिनच्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी आजीच्या भूमिकेत असल्यानंतर येणाऱ्या अनुभवांबद्दल वक्तव्य केलं आहे. नीता अंबानी म्हणाल्या, ‘आकाश मला कायम सांगत असतो, तू आता आजी झाली आहेस, म्हणून मुलांवर आजी सारखं प्रेम करत, त्यांची आई होऊ नकोस… मला आता माझ्या मुलांना त्यांच्या मुलांचा योग्य रित्या सांभाळ करण्यासाठी स्पेस दिला पाहिजे.’

‘मला आता माझ्या नातवंडांवर एक आई म्हणून नाही तर, एक आजी म्हणून प्रेम करायचं आहे. मला त्यांना माझ्या धाकात ठेवायचं नाही. आज आजी म्हणून मला त्यांच्या अफाट प्रेम करायचं आहे… मुलं कायम मोठ्या व्यक्तींचं अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांनी चांगली मुल्य शिकवणं ही आपली जबाबदारी आहे..’ असं देखील नीता अंबानी म्हणालेल्या.

एवढंच नाही तर, यावेळी नीता अंबानी यांनी त्यांच्या आजी – आजोबांसोबत असलेल्या आठवणी देखील शेअर केल्या. ‘मी एकत्र कुटुंबात राहिली आहे.. माझे आजोबा फ्रेंच प्रोफेसर होते आणि ते बिर्लांसाठी काम करायचे.. माझी आजी देखील कठोर आणि शिस्तप्रिय होती…’, असं देखील नीता अंबानी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

नीता अंबानी आणि मुकेश अंबाना यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या तिन्ही मुलांची लग्न झाली आहेत.आकाश अंबानी आणि ईशा अंबानी, अनंत अंबानी यांचं लग्न झालं आहे. अंबानी कुटुंबातील लहान मुलगा म्हणजे अनंत यांचं मोठ्या थाटात राधिका मर्चेंट यांच्यासोबत लग्न झालं आहे.

Follow Us
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन