AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात? वापरा मुलतानी मातीचा फेस पॅक !

त्वचा कोरडी पडण्याची समस्या आता सामान्य झाली आहे.

कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात? वापरा मुलतानी मातीचा फेस पॅक !
फेस पॅक
| Updated on: Mar 31, 2021 | 5:18 PM
Share

मुंबई : त्वचा कोरडी पडण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. परंतु, काही लोकांची त्वचा इतकी कोरडी होते की, त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरपासून बाजारात मिळणारी सर्वात महाग उत्पादने देखील फार काळ काम करत नाहीत. जर, आपल्यासोबतही असेच काही घडत असेल तर, आपण घरगुती आणि आयुर्वेदिक मुलतानी मातीचे फेस लावून कोरडेपणाची समस्या दूर करू शकतात आणि काही दिवसांत त्वचाही चमकदार दिसू लागेल. (Multani clay face pack is beneficial for the skin)

-तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.

-एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. यानंतर मॉइश्चराइझर देखील लावावे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थेट चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नये.

-मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्यात, ऑलिव्ह ऑईल मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दीड तासानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होईल. एक मोठा चमचा मध, अर्धा चमचा हळद, एक चमचा दूध एका वाटीमध्ये मध आणि हळद एकत्र घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर 15 मिनिटांसाठी लावा.

-बाजारात मिळणारी बरीच उत्पादने वापरल्यानंतरही, जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जात नसतील तर लिंबू आणि मधाची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा साधारण 15 मिनिटांनंतर हे धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने तुमचा चेहरा साफ होईल. निरोगी आणि चमकणारी त्वचेसाठी, एक चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे मध मिसळा. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. लिंबू त्वचेचे डाग आणि चेहरा स्वच्छ करतो.

संबंधित बातम्या : 

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Multani clay face pack is beneficial for the skin)

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.