AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | कृत्रिम हेअर कलरमुळे होईल केसांचे नुकसान, ट्राय करा ‘हा’ नैसर्गिक हेअर मास्क!

आजकाल केसांना रंग करणे फॅशनचा ट्रेंड बनत चालला आहे. विशेषतः मुली आणि महिलांमध्ये याची खूप क्रेझ आहे. केस रंगवण्यासाठी मुली भरपूर पैसे खर्च करतात.

Hair Care | कृत्रिम हेअर कलरमुळे होईल केसांचे नुकसान, ट्राय करा ‘हा’ नैसर्गिक हेअर मास्क!
केस
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 04, 2021 | 1:40 PM
Share

मुंबई : आजकाल केसांना रंग करणे फॅशनचा ट्रेंड बनत चालला आहे. विशेषतः मुली आणि महिलांमध्ये याची खूप क्रेझ आहे. केस रंगवण्यासाठी मुली भरपूर पैसे खर्च करतात. कलर केल्यानंतर काही दिवस केस खूप सुंदर दिसतात. पण, हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. या कृत्रिम रंगामुळे केसांचे नुकसान होते आणि याची माहिती होईपर्यंत आपले केस खूप कमकुवत आणि निर्जीव झाले असतात (Natural Hair Mask for hair growth and colour).

कृत्रिम हेअर कलरचे दुष्परिणाम :

  1. ट्रेंड म्हणून वारंवार केसांचा रंग बदलल्यास आपल्या केसांचे नुकसान होऊ शकते. त्यांची वाढ थांबू शकते. तसेच, केस गळणे आणि केस पातळ होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
  2. हेअर कलरमध्ये वापरली जाणारी सर्व रसायने आपल्या डोळ्यांवर परिणाम करतात. यामुळे, आपली दृष्टी खूप कमकुवत होऊ शकते. तसेच, या रंगांच्या अति वापरामुळे काही लोकांना विस्मरणाचा धोका देखील निर्माण झाला आहे.
  3. ज्यांना दमा किंवा अस्थमाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी केसांचा कृत्रिम रंग बर्‍याच समस्या निर्माण करू शकतो. केसांच्या रंगात अशी सर्व रसायने आहेत ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
  4. बरेच लोक केसांना रंगवण्यासाठी हेअर डायचा वापर करतात. त्यासर्व लोकांमध्ये कर्करोग होण्याचा धोका वाढतो आहे. डाय किंवा कृत्रिम रंग वापरताना, आपल्याला थोडाशी अॅलर्जी वाटत असेल, तर त्याचा वापर लगेच थांबवा (Natural Hair Mask for hair growth and colour).

खराब झालेल्या केसांसाठी नैसर्गिक हेअर मास्क ठरेल उपयोगी!

जर, आपले केस कृत्रिम रंगाने खराब आणि कमकुवत झाले असतील, तर आपण घरात असलेल्या काही नैसर्गिक गोष्टींसह केसांचा एक चांगला मास्क तयार करू शकता. हा हेअर मास्क आपल्या केसांच्या वाढीस मदत करेल आणि केसांची गळती रोखेल.

हेअर मास्क कसा बनवायचा?

नैसर्गिक हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात तीन चमचे कोरफड, दोन चमचे एरंडेल तेल, चार चमचे ऑलिव्ह ऑईल, एक केळी, चार चमचे दही आणि अंड्याचा पिवळा भाग घेऊन चांगल्याप्रकारे मिसळा. यात मिश्रणात केळी दह्यासोबत वाटून हे मिश्रण आधीच्या मिश्रणात मिसळावे. यानंतर हा हेअर मास्क केसांवर लावावा आणि थोडा वेळासाठी केस तसेच ठेवावेत. काही वेळाने केस धुवावेत. जर, केस जास्त खराब झाले असतील तर, आठवड्यातून दोनदा या हेअर मास्कचा वापर करावा. याने लवकरच चांगला फायदा दिसून येईल.

(Natural Hair Mask for hair growth and colour)

हेही वाचा :

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!