Hair Care | केसांच्या समस्येवर घरगुती रामबाण उपाय!

केसांच्या समस्यांवर घरच्या घरी (home remedies) काही मिश्रण एकत्र करून तुम्ही आयुर्वेदिक उपाय करू शकता.

Hair Care | केसांच्या समस्येवर घरगुती रामबाण उपाय!
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 7:45 PM

मुंबई : हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. केसगळती, शुष्क केस, कोंडा अशा अनेक समस्या प्रत्येकालाच भेडसावत आहेत. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी (Hair Care) घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. यावर समस्यांवर घरच्या घरी (home remedies) काही मिश्रण एकत्र करून तुम्ही आयुर्वेदिक उपाय करू शकता (Hair Care Tips home remedies).

केस गळती रोखण्यासाठी तेल :

साहित्य : ब्राह्मी पावडर, आवळा पावडर, भृंगराज पावडर, जटामांसी पावडर, नागरमोथा पावडर (प्रत्येकी 25 ग्रॅम), कांद्याचा रस (2/3 चमचे), मेंदी पेस्ट (2 चमचे), कडीपत्ता पेस्ट (1 चमचा), मेथीच्या दाण्यांची पेस्ट (1 चमचा)

कृती : एका लोखंडी भांड्यात ब्राह्मी पावडर, आवळा पावडर, भृंगराज पावडर, जटामांसी पावडर, मेथीच्या दाण्याची पेस्ट, कांदा रस, मेंदी पेस्ट, कडीपत्ता पेस्ट, नागरमोथा पावडर आणि थोडे पाणी टाकून 2 दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनी या मिश्रणात थोडे नारळाचे तेल, थोडे एरंडी तेल आणि तिळाचे तेल टाकून हलक्या आचेवर शिजवा. जेव्हा पाणी आटून खाली फक्त तेल शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. आता या मिश्रणाला गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवा. दररोज झोपण्या पूर्वी हे तेल कोमट करून, त्याने डोक्याची मालिश करा. या तेलामुळे केसांच्या समस्या दूर होण्यासोबतच केस घनदाट आणि आकर्षक होण्यास मदत मिळेल. (Hair Care Tips home remedies)

कोंडा दूर करण्यासाठी :

लिंबाचा रस : लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल.

खोबरेल तेल : खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.

कांद्याचा रस : एका कांद्याचा रस काढून, कापसाच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर लावावा. त्यानंतर 20 मिनिटांनी केस धुवून टाकावे. त्यामुळे कोंड्याची समस्या नाहीशी होऊन, केसगळती रोखण्यास मदत होते.

बेकिंग सोडा : 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.

**(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Hair Care Tips home remedies)

संबंधित बातम्या :

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय

कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.