Hair Care : केस होतील घनदाट आणि मजबूत, किचनमधील ही एक वस्तू वापरा, लगेच दिसेल बदल; वाचा काय करावं?

केसगळती, केस तुटणे किंवा केसांची वाढ मंदावल्यामुळे अनेकजण घरगुती उपाय शोधतात. कांद्याचा रस केसांच्या काळजीसाठी कसा वापरला जातो आणि तो वापरताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Hair Care : केस होतील घनदाट आणि मजबूत, किचनमधील ही एक वस्तू वापरा, लगेच दिसेल बदल; वाचा काय करावं?
hair care tips
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 9:31 PM

केस गळणे, तुटणे आणि केसांची वाढ खुंटल्यामुळे अनेकजण महागडी हेअर केअर प्रोडक्ट्स वापरून पाहतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असलेला कांदाही केसांच्या काळजीसाठी वापरला जातो. कांद्यामध्ये सल्फरसारखे पोषक घटक असतात , त्यामुळे हेअर केअर रूटीनमध्ये कांद्याचा वापर केला जातो.

कांद्याचा रस कसा वापरायचा

यासाठी २ ते ३ कांदे घ्या. कांदा सोलून त्याचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता हे मिश्रण मलमलच्या कपड्याने किंवा बारीक गाळणीने गाळून त्याचा रस काढा. तयार झालेला रस काही काळ फ्रिजमध्ये ठेवू शकता.

अॅलोवेरा जेलसोबत कांद्याचा रस

कांद्याचा रस थेट स्कॅल्पवर लावल्याने काही जणांना कोरडेपणा किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे त्यात अॅलोवेरा जेल मिसळून वापरता येतो. कांद्याच्या रसात अॅलोवेरा जेल मिसळा आणि हवं असल्यास काही थेंब ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण स्कॅल्पवर लावून साधारण ३० मिनिटांनी माइल़्ड शॅम्पूने धुवा.

अंड्यासोबत बनवा हेअर मास्क

केसांसाठी आणखी एक घरगुती पर्याय म्हणजे कांद्याचा रस आणि अंड्याचा मास्क. एका मोठ्या चमचाभर कांद्याच्या रसात १ अंड फेटून घ्या. हे मिश्रण स्कॅल्पपासून केसांच्या लांबीपर्यंत लावा. साधारण २० ते ३० मिनिटांनी साध्या किंवा थंड पाण्याने आणि माईल्ड शॅम्पूने केस धुवा.

कॅस्टर ऑईलमध्ये मिसळूनही वापरता येतो

कांद्याचा रस आणि कॅस्टर ऑईल म्हणजेच कॅस्टर ऑईल म्हणजेच तेल समान प्रमाणात घेऊन हे मिश्रण तयार करू शकता. हे मिश्रण केसांच्या मुळांवर आणि स्कॅल्पवर हलक्या हाताने लावा. साधारण ३० ते ६० मिनिटांनी माइल्ड शॅम्पूने केस धुवा

पण आधी पॅच टेस्ट करा

कांद्याचा रस सगळ्यांना स्कॅल्पला सूट होईलच असं नाही. काही लोकांना यामुळे खाज, जळजळ होऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा वापरण्यापूर्वी स्कॅल्पच्या छोट्या भागावर थोडासा रस लावून पॅच टेस्ट करा. कांद्याचा वासही बऱ्याच लोकांना तीव्र असतो. त्यामुळे तो सहन होत नसेल तर जबरदस्तीने वापरण्याची गरज नाही.

 

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us