AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Split Ends मुळे खुंटली केसांची वाढ ? ‘ही’ काळजी घेतली तर समस्या होईल दूर, केस दिसतील सुंदर

केसांची काळजी घेण्यासाठी, आपण प्रथम केसांची निगा राखणे, हेअर केअर रूटीन फॉलो करणे आवश्यक आहे जेणेकरून ते खराब होणार नाहीत आणि जाड दिसू शकतील.

Split Ends मुळे खुंटली केसांची वाढ ? 'ही' काळजी घेतली तर समस्या होईल दूर, केस दिसतील सुंदर
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 22, 2023 | 8:15 AM
Share

नवी दिल्ली : घनदाट आणि लांब केसांसाठी, आपण वेगवेगळे हेअर केअर रुटीन (hair care routine) फॉलो करत असतो. यासाठी बऱ्याच महिला सलूनमध्ये जातात तसेच वेगवेगळी सौंदर्य उत्पादनेही वापरतात. अनेकवेळा महिला केसांचा पोत समजून न घेता, कळत-नकळतपणे काही चुका करतो, ज्यामुळे आपले केस खराब (hair damage) होतात. तसेच आजकाल स्प्लिट एंड्सची (split ends) म्हणजेच दुभंगलेल्या केसांची समस्या आजकाल अगदी सामान्य झाली आहे. आजकाल अनेक महिलांन केसांना फाटे फुटण्याचा किंवा ते दुभंगण्याचा त्रास सहन करावा लागतो. केसांसाठी वापरण्यात येणारे केमिकल्स (harmful chemicals) आणि हेअर स्ट्रेटनर यामुळे केस दुभंगण्याचा धोका जास्त असतो. फाटे हे केसांना कुठेही फुटू शकतात. पण शक्यतो लांब केसांच्या शेवटच्या टोकाला फाटे फुटल्याचे दिसून येते. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे यामुळे केसांची वाढ खुंटते.

तुम्हालाही स्प्लिट एंड्सचा त्रास असेल तर काही गोष्टी करणे पूर्णपणे टाळावे, अन्यथा केस दुभंगण्याचा त्रास आणखीनच वाढू शकतो.  केसांच्या काळजीशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

ओले केस विंचरणे

अनेकदा आपण केस ओले असताना कंगव्याचा वापर करतो, त्यामुळे आपले केस कोरडे होतात आणि स्प्लिट एंड्सही वाढतात. तसेच केस गळूही लागतात. त्यामुळे तुमचे केस ओले असतील तर केसांमध्ये कंगवा अजिबात वापरू नका, ते आधी पूर्ण कोरडे होऊ द्या. असे केल्याने तुमचे केस अडकणार नाहीत आणि त्यांचे नुकसान होण्यापासून वाचेल.

केस न कापणे

बऱ्याच काळापासून केस कापले नसतील तरीही स्प्लिट एंड्सची समस्या दिसून येते. प्रत्येक महिलेने किंवा तरूणीने किमान 6 महिन्‍यांनंतर तरी त्यांचे केस ट्रिम केले पाहिजेत. जेणेकरून ते दुभगंणार नाही व ते डॅमेज फ्री राहतील.

कंडीशनर न वापरणे

अनेकदा आपण घाईघाईत केस धुण्यासाठी फक्त शांपूचा वापर करतो, त्यांना नंतर कंडीशनर लावत नाही. पण केसांना योग्य प्रमाणात ओलावा मिळायला हवा असेल तर शांपूसोबत केसांना कंडीशनर लावणे अत्यावश्यक असते.

केस वारंवार धुणे

केस वारंवार धुणे हे देखील स्प्लिट एंड्सचे किंवा केस दुभंगण्याचे कारण असू शकते. केस वारंवार धुतल्याने त्यातील आर्द्रता कमी होते आणि केस कोरडे होऊ लागतात. जर तुम्हाला स्प्लिट एंड्स टाळायचे असतील तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच केस धुवावेत.

Follow Us
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं