केसांनी भरलेला चेहरा,वाढलेला लठ्ठपणा; सचिन तेंडुलकरची लेक साराला होता हा गंभीर आजार, स्वत:च केला खुलासा

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने तिच्या एका गंभीर आजाराबद्दल सांगितलं. या आजारामुळे तिच्या शरीरात इतके बदल झाले होते की तिच्या चेहऱ्यावर केस येत होते, वजन वाढत होते. या आजारातून बाहेर येण्यासाठी तिने काय काय मेहनत घेतली किंवा तिचा या आजाराबद्दलचा काय भयानक अनुभव होता हे तिने सांगितलं आहे.

केसांनी भरलेला चेहरा,वाढलेला लठ्ठपणा; सचिन तेंडुलकरची लेक साराला होता हा गंभीर आजार, स्वत:च केला खुलासा
sara tendulkar
Image Credit source: instagram
| Updated on: May 27, 2025 | 7:15 PM

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. सारा आज तिच्या फिटनेस आणि निरोगी त्वचेमुळे चर्चेत असते. पण याची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल की काही काळापूर्वी साराने तिला एक आजार असल्याचं सांगितलं.ज्यामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. या आजारामुळे साराच्या चेहऱ्यावर खूप मुरुमे येत होते, केसही येत होते. वजन वाढत होतं. या सर्व लक्षणांमुळे ती फार अस्वस्थ असायची.

साराला होता हा आजार

साराला PCOS चा त्रास असल्याचं तिने उघड केले होते. तिने एकदा चाचणी केल्यानंतर, साराला तिच्या आजाराबद्दल समजले. तिने तिचा हा भयानक अनुभव सांगितला आहे. अलीकडेच, एका मुलाखतीत सारा तेंडुलकरने सांगितले की, पीसीओएसपासून आराम मिळवण्यासाठी तिने तिच्या दैनंदिन आहारात, जीवनशैलीत आणि त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत बदल केले आणि आज तिला खूप बरे वाटत आहे.

पीसीओएस म्हणजे काय?

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये महिलेच्या अंडाशयात किंवा गर्भाशयात गाठी तयार होतात. या गाठींमुळे त्वचेवर आणि शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. साराने सांगितले की तिला किशोरावस्थेत हा आजार झाला होता.

पीसीओएसची लक्षणे काय?

PCOS मुळे साराच्या चेहऱ्यावर हार्मोनल पिंपल्स होते. हे मुरुमे हे पीसीओएसचे एक महत्त्वाचे लक्षण आहेत. पीसीओएसच्या इतर लक्षणांमध्ये चेहऱ्यावरील केसांची वाढ (यामुळे काही मुलींना दाढी आणि मिशा वाढतात), शरीराचे वजन वाढणे इत्यादींचा समावेश आहे. हे देखील वाचा – मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी या घरगुती टिप्स फॉलो करा.


सौंदर्यप्रसाधने वापरणे बंद केले

सारा तेंडुलकरने सांगितले की, मुरुमे आणि चेहऱ्यावरील केसांमुळे तिचा आत्मविश्वास कमी होत होता. यामुळे ती नेहमी काळजीत असायची. सारा म्हणाली की तिने निरोगी जीवनशैली स्वीकारली आणि PCOS वर मात केली. सारा तेंडुलकरच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत फक्त अगदी मूलभूत आणि आवश्यक गोष्टींचा समावेश केला आहे. ती तिच्या त्वचेवर अ‍ॅसिड आणि रेटिनॉल असलेली सौंदर्य उत्पादने वापरत नाही.

साराचा आहार

ती तिच्या सकाळची सुरुवात एक ग्लास पाणी, काही ड्रायफ्रुट्स आणि एक कप ब्लॅक कॉफीसह होते. या प्रकारचा नाश्ता तिला हायड्रेटेड राहण्यास, तिच्या उर्जेची पातळी वाढवण्यास आणि तिच्या शरीराला पोषण देण्यास नक्कीच मदत करतो. यासोबतच, सारा सकाळी व्यायाम देखील करते ज्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होते. तसेच तिला शाळेपासूनच पीसीओएसचा त्रास होता. आजारातून बरे होण्यासाठी तिला तिच्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागले. तिने तिच्या या आजारावर योग्य आहार, व्यायाम अशा अनेक गोष्टींच्या साथीने अखेर मात केली आहे.