
आता जवळपास असं एकही घर सापडणार नाही ज्या घरात रेफ्रिजरेटर नाही. अन्नपदार्थ दीर्घकाळ साठवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर आपम सगळेच करतो. उरलेले अन्न, फळे आणि भाज्या न खराब होता फ्रिजमध्ये बराच काळ चांगल्या राहाव्यात यासाठी ठेवतो. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की अशा काही गोष्टी आहेत ज्या जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नयेत. सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित गोष्टी शेअर करणाऱ्या पोषणतज्ञ रीता जैन यांनी एका पोस्टमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्या म्हणतात अशा काही गोष्टी आहेत ज्या 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. जर तुम्ही या गोष्टी जास्त काळ साठवून ठेवल्या असतील तर त्या न वापरता फेकून दिलेल्याच चांगल्या आहेत. चला जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहेत.
सोललेला लसूण
सोललेला लसूण कधीही 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये. असे केल्याने लसूण खूप लवकर बुरशी पकडतो, तो तसाच भाज्यामध्ये वापरला तर त्यामुळे श्वसनमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, दमा किंवा फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही आजाराचा धोका वाढतो.
चिरलेला कांदा कधीही जास्त काळ ठेवू नये
चिरलेला कांदाही जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. खरं तर, चिरलेला कांद्यावर बॅक्टेरियांना लवकर तयार होतात. ज्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाची शक्यता वाढते. तज्ज्ञांचे मते या परिस्थितीत यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान होण्याचा धोका देखील वाढतो आणि स्वयंप्रतिकार रोग देखील होऊ शकतात. म्हणून, कांदा कापल्यानंतर तो लगेच वापरावा. तसेच कापलेला किंवा अर्धा कांदा जरी असेल तरी तो जास्त काळ साठवू ठेवू नका.
चिरलेले आले
तज्ज्ञांच्या मते, चिरलेले आले कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमधील ओलाव्यामुळे आल्याला बुरशी पकडते . आल्यावर काळे डाग तुम्ही पाहिले असतील, हा तो बुरशीचाच प्रकार आहे. तसेच ते खाण्यात आले तर अशा आल्याचा वापर केल्याने श्वसनमार्गाचे संसर्ग देखील होऊ शकतात. याशिवाय ते थेट मेंदूवरही परिणाम करू शकतात. तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला आले साठवायचे असेल तर प्रथम ते उन्हात चांगले वाळवा, त्यानंतरच साठवा.
तांदूळ 24 तासांपेक्षा जास्त काळ साठवू नका
लोक अनेकदा उरलेले म्हणजे भिजवलेले तांदूळ फ्रिजमध्ये ठेवतात. तज्ज्ञांचे म्हते आहे की ही एक चांगली सवय आहे. फ्रिजमध्ये तांदूळ साठवल्याने त्याचा स्टार्च प्रतिरोधक स्टार्चमध्ये रूपांतरित होतो, ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी होतो. अशा परिस्थितीत ते वजन कमी करण्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पण कधीही 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने, त्यात सूक्ष्म विषारी पदार्थ तयार होऊ शकतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
दरम्यान फळे आणि काही भाज्या सोडल्यास शक्यतो अन्न पदार्थ असोत किंवा मग वर दिलेले पदार्थ असोत. 24 तासांच्या नंतर वापरात आणू नये. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.