AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, खाण्याचे आहेत फायदेच फायदे

तुम्ही कुठल्याही भाजी मार्केटमध्ये जा तुम्हाला शेवग्याच्या शेंगा सहज कुठेही उपलब्ध होतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे या भाजीला जगातील सर्वात शक्तिशाली भाजी मानलं जातं.

'ही' आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, खाण्याचे आहेत फायदेच फायदे
| Updated on: May 22, 2025 | 7:43 PM
Share

तुम्ही भाजी मार्केटमध्ये जात असाल, तर तिथे तुम्हाला विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या दिसतात. या फळभाज्या, पालेभाज्या शरीरासाठी लागणाऱ्या विविध घटकांचा उत्तम नैसर्गिक स्त्रोत असतात. भाज्यांच्या सेवनातून तुमच्या शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात. मात्र या सर्व भाज्यांमध्ये अशी देखील एक भाजी आहे, ज्या भाजीला जगातील सर्वात शक्तिशाली भाजी मानलं जातं. ही भाजी अनेक जण आवडीने खातात. ही भाजी दुसरी तिसरी कोणती नसून शेवगा आहे.

तुम्ही कुठल्याही भाजी मार्केटमध्ये जा तुम्हाला शेवग्याच्या शेंगा सहज कुठेही उपलब्ध होतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे या भाजीला जगातील सर्वात शक्तिशाली भाजी मानलं जातं. अनेकांना ही भाजी आवडत नाही, मात्र ही जगातील सर्वात शक्तिशाली आणि पोषक तत्वांनी समृद्ध अशी भाजी आहे. तुमच्या शरीराला महागडे सप्लिमेंट्स आणि जीवनसत्त्वे जी ताकत देऊ शकत नाही, तेवढी ताकद तुम्हाला या भाजीच्या सेवनातून मिळते, म्हणूनच शेवग्याच्या शेंगाना सुपरफूड मानलं जातं.

शेवग्याच्या सेवनाचे फायदे

शेवग्याच्या शेंगामध्ये आणि पानांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि लोहाचं प्रमाण असंत. जे व्यक्ती केवळ शाकाहारी पदार्थच खातात त्यांच्यासाठी ही भाजी एक उत्तम पर्याय आहे.

या भाजीमध्ये व्हिटामीन सी आणि ए तसेच एंटीऑक्सीडेंट्स असतात, जे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात.

तुम्ही जर शेवग्याच्या शेंगा नियमितपणे खाल्ल्या तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते.ज्या लोकांना मधुमेहासारखे आजार आहेत, अशा लोकांसाठी ही भाजी एक वरदान मानली जाते.

शेवग्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे तुम्हाला जर अपचनाचा त्रास असेल तर शेवग्याची भाजी नियमीत खाल्ल्यास तुमची पचन क्षमता सुधारते.

तसेच ही भाजी म्हणजे कॅश्लिअम आणि फॉस्फरसचा देखील उत्तम स्त्रोत असतो.  त्यामुळे तुम्ही जर नियमितपणे या भाजीचं सेवन केलं तर तुमची हाडं देखील मजबूत होतात.

टीप वरील माहिती ही उपलब्ध माहितीच्या स्त्रोतावरून देण्यात आली आहे, टीव्ही 9 मराठी याला दुजोरा देत नाही, कोणताही गोष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?