AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरांनी बदलला भारताचा ट्रॅव्हल ट्रेंड? गोवा-मनालीऐवजी केदारनाथ, काशी अन् कैची धामला पसंती

Travel Trend: गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या प्रवासाच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. लोक आता विविध मंदिरांना मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. प्रवासाच्या या पद्धती कशा बदलत आहेत, हे जाणून घ्या.

मंदिरांनी बदलला भारताचा ट्रॅव्हल ट्रेंड? गोवा-मनालीऐवजी केदारनाथ, काशी अन् कैची धामला पसंती
| Edited By: | Updated on: Oct 13, 2026 | 3:06 PM
Share

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या लाँग वीकेंडला उत्तराखंडमधील कैंची धाम येथे भाविकांची संख्या 50 हजारांच्या वर गेली. भाविकांची वाढती गर्दी पाहता प्रशासनाला रजिस्ट्रेशन, भाविकांची संख्या मर्यादित करणे आणि शटल सेवा यांसारख्या व्यवस्थांचा विचार करावा लागत आहे. 2 ऑक्टोबर रोजी चार धाम यात्रेसाठी 39,567 भाविकांची नोंद झाली. यावरून आता सुट्ट्यांमध्ये गोवा, शिमला आणि मनालीसोबतच केदारनाथ, कैंची धाम, काशी, अयोध्या, वृंदावन आणि उज्जैनसारख्या धार्मिक स्थळांनाही पसंती मिळत असल्याचे दिसते. दर्शनासोबतच पर्वत, घाट, स्थानिक खाद्यपदार्थ, बाजारपेठा आणि सोशल मीडियावरील अनुभवांमुळे भारताचा ट्रॅव्हल मॅप बदलत आहे.

दर 100 डोमेस्टिक ओव्हरनाइट ट्रिपपैकी 48 प्रवास धार्मिक

जुलै 2025 ते जून 2026 दरम्यान झालेल्या डोमेस्टिक टुरिझम एक्स्पेंडिचर सर्व्हेनुसार, दर 100 ओव्हरनाइट ट्रिपपैकी सुमारे 48 ट्रिप धार्मिक आणि तीर्थयात्रांसाठी झाल्या. हा सर्व्हे 2.46 लाखांहून अधिक हाऊसहोल्ड्सवर करण्यात आला. विशेष म्हणजे ग्रामीण टुरिस्ट हाऊसहोल्ड्स मध्ये दर 100 घरांमागे सरासरी 127 ओव्हरनाइट ट्रिप, तर शहरी हाऊसहोल्ड्स मध्ये 132 ट्रिप नोंदवण्यात आल्या. यावरून प्रवासाचे प्रमाण वाढत असून, त्यात धार्मिक यात्रांचा सर्वाधिक वाटा असल्याचे स्पष्ट झाले.

ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर

गोवा, केरळ आणि राजस्थान हे पूर्वी लोकप्रिय ट्रॅव्हल डेस्टिनेशन मानले जात होते. मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश 15.7% व्हिजिटर ट्रिप्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूचा वाटा 13.4%, तर राजस्थानचा 8% आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरही पर्यटकांची संख्या वाढली आहे. अयोध्येत पर्यटकांची संख्या 2023 मधील 5.76 कोटींवरून 2024 मध्ये 16.44 कोटी झाली. वाराणसीत 10.18 कोटींवरून 11 कोटी, तर मथुरेत 7.79 कोटींवरून सुमारे 9 कोटी पर्यटक पोहोचले. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या सहा महिन्यातच अयोध्येत 23 कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली होती, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

कैंची धाममध्ये पर्यटकांची मोठी वाढ

उत्तराखंडमधील कैंची धाम येथे 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे 24.34 लाख पर्यटकांनी भेट दिली. मागील संपूर्ण वर्षात ही संख्या 8 लाख होती. सोशल मीडिया, सेलिब्रिटींच्या भेटी आणि ‘हनुमान अंश’ चित्रपटामुळे नीम करोली बाबा आणि कैंची धाम तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहे.

केदारनाथ धार्मिक स्थळासोबतच ट्रॅव्हल एक्स्पिरियन्स

केदारनाथला भेट देणाऱ्या तरुणांसाठी दर्शनासोबत ट्रेकिंग, पर्वतरांगांचा अनुभव आणि अ‍ॅडव्हेंचर हेही आकर्षण ठरत आहे. त्यामुळे केदारनाथची यात्रा केवळ धार्मिक प्रवासापुरती मर्यादित न राहता तरुणांच्या संपूर्ण ट्रॅव्हल प्लॅनचा भाग बनत आहे.

काशीमध्ये दर्शनासोबत खाद्यसंस्कृती आणि पर्यटन

काशीमध्ये बाबा विश्वनाथांचे दर्शन, गंगेच्या घाटांवरील नौकाविहार, बनारसी चाट, जुन्या गल्ल्या आणि बनारसी साड्यांच्या खरेदीचा अनुभव पर्यटकांना आकर्षित करत आहे. सोशल मीडिया रील्समुळे काशी धार्मिक पर्यटनासोबतच कंटेंट क्रिएटर्समध्येही लोकप्रिय झाली आहे.

अयोध्या, मथुरा-वृंदावनमध्येही पर्यटनाचा नवा ट्रेंड

अयोध्या आणि मथुरा-वृंदावन येथे मंदिर दर्शनासोबत ऐतिहासिक वारसा, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि आधुनिक पर्यटन सुविधांनाही महत्त्व मिळत आहे. देशातील 48% डोमेस्टिक ओव्हरनाइट ट्रिप्स धार्मिक कारणांसाठी होत असून, उत्तर प्रदेशचा व्हिजिटर ट्रिप्समधील वाटा 15.7% टक्के आहे. यावरून धार्मिक पर्यटन भारतीयांच्या ट्रॅव्हल ट्रेंडमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवत असल्याचे दिसते.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल