
नवी दिल्ली : आपली त्वचा छान, स्वच्छ, चमकदार (clear skin) दिसावी असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळे ती स्वच्छ ठेवण्यासाठी लोक अनेक सौंदर्य उत्पादने वापरतात. काहींना फायदा होतो, पण काहींना फरक पडत नाही. तसेच त्या उत्पादनांमध्ये अनेक हानिकारकल केमिकल्सही (chemicals) असू शकतात. आणि एवढं करूनही बऱ्याच वेळेस आपले कोपर आणि गुडघे अनेकदा गलिच्छ आणि गडद दिसतात. स्किन केअर रुटीन फॉलो (skin care routine)केले तरी कोपर आणि गुडघे स्वच्छ होण्याचे नाव घेत नाहीत.
अशा परिस्थितीत जर तुमच्या कोपरावर घाण जमा झाली असेल तर काही घरगुती वस्तूंनी तुम्ही काही मिनिटांत त्वचा चमकदार करू शकता. म्हणूनच कोपर आणि गुडघे स्वच्छ करण्याच्या टिप्स जाणून घेऊया.
काकडीचा वापर करून पहा
काकडीच्या मदतीने तुम्ही कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करू शकता. यासाठी काकडी गोल आकारात कापून घ्या. आता काकडीचे काप कोपर आणि गुडघ्यावर चोळा. 15 मिनिटे चोळल्यानंतर 5 मिनिटे वाळू द्या. यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमचे कोपर आणि गुडघे स्वच्छ होतील.
बेकिंग सोडा आणि लिंबाची मदत घ्या
बेकिंग सोडा हा त्वचेसाठी सर्वोत्तम क्लिंजर मानला जातो. दुसरीकडे, अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेले लिंबू हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त आहे. अशावेळी लिंबू मधून कापून घ्या. आता त्यावर 1 चमचा बेकिंग सोडा लावा आणि कोपर आणि गुडघ्यांना चोळा. त्यानंतर 15 मिनिटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
कोरफड आणि दूध
कोरफड ही किती औषधी असते तुम्हाला माहीत आहेत. घटकांनी समृद्ध कोरफड हा अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे स्किन केअर रूटीनमध्ये त्याचा नियमित वापर करणे फायदेशीर ठरते. कोपर व गुडघ्याचा काळेपणा घालवण्यासाठी कोरफड वापरता येते. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा रस किंवा जेलमध्ये थोडे दूध मिसळा. आता हे मिश्रण कोपर आणि गुडघ्यांवर लावा. ते रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.
बटाट्याचा रस
कोपर आणि गुडघ्यांमध्ये साचलेली घाण, मळ दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता. यासाठी बटाटे किसून घ्या. आता एका भांड्यात त्याचा रस पिळून घ्या. नंतर बटाट्याचा रस त्वचेवर लावा आणि 15 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्वचेवर मॉयश्चरायझर लावा.
हळद वापरा
त्वचेचा पोत व रंग सुधारण्यासाठीही हळदीचा वापर उत्तम आहे. यासाठी 1 चमचे दूध हळद पावडरमध्ये मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट कोपर आणि गुडघ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर काही वेळाने त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
खोबरेल तेल ठरेल उपयोगी
खोबरेल तेलाचा वापर करून देखील तुम्ही कोपर आणि गुडघ्यांची त्वचा स्वच्छ करू शकता. यासाठी दररोज आंघोळीनंतर त्वचेला खोबरेल तेल लावावे. नंतर कोपर आणि गुडघ्यांना 2-3 मिनिटे मालिश करावे.
मध
मधाच्या मदतीने तुम्ही त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवू शकता. यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये 2 चमचे मध आणि 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता हे मिश्रण त्वचेवर लावा आणि 20-30 मिनिटांनंतर त्वचा थंड पाण्याने धुवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)