AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day 2023 : ‘प्रेमात वेळा’पत्रक पाळावं लागतंय का? प्रेमात वेळकाळ असतो का, पाहा हे शेड्युल

प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत असतात, त्यामुळे तुमच्या मनातील भावना आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त करण्याआधी पाहा प्रेमाच्या दिवसांचा वेळापत्रक...

Valentine Day 2023 : 'प्रेमात वेळा'पत्रक पाळावं लागतंय का? प्रेमात  वेळकाळ असतो का, पाहा हे शेड्युल
Valentine Day 2023
| Updated on: Feb 04, 2023 | 1:59 PM
Share

Valentine’s Calendar 2023 : प्रेम… प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असते. त्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त एका निमित्ताची गरज असते. तर फेब्रुवारी महिना प्रेमात अडकलेल्यासाठी प्रचंड खास असतो. एवढंच नाही तर, फेब्रुवारी महिना म्हणजे फक्त प्रेम करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. फेब्रुवारी महिन्यात आपण आपल्या खास व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करतो. म्हणून अनेक जण फेब्रुवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असतात. ७ फेब्रुवारी पासून ते १४ फेब्रुवारी पर्यंत प्रेमाचा आढवडा साजरा केला जातो. तर आज जाणून घेवू व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात कधी आहे रोज डे, चॉकलेट डे आणि इतर डे…

व्हॅलेंटाईन डेचा आठवडा (Valentine Week List 2023) ७ फेब्रुवारी – रोज डे, गुरुवार ८ फेब्रुवारी – प्रपोज डे, शुक्रवार ९ फेब्रुवारी – चॉकलेट डे, शनिवार १० फेब्रुवारी – टेडी डे, रविवार ११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे, सोमवार १२ फेब्रुवारी – हग डे, मंगळवार १३ फेब्रुवारी – किस डे , बुधवार १४ फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे , गुरुवार

सांगायचं झालं तर, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे केव्हाही प्रेम व्यक्त करु शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा महिन्याची गरज नसते. पण फेब्रुवारी महिन्याची गोष्टच वेगळी असते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत आसला आणि त्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करत असाल, तर फेब्रुवारी महिन्याचा प्रेमाचा आठवडा प्रचंड खास आहे. जर तुम्ही प्रेमाच्या आठवड्यात योग्य संधी साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलात, तर ती व्यक्ती देखील प्रचंड आनंदी होईल.

१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी प्रचंड खास आणि स्पेशल असतो. या दिवशी सर्वत्र आनंद साजरा केला जातो. सर्वप्रथम अमेरिकेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला, त्यानंतर हळू-हळू हा दिवस संपूर्ण जगात साजरा होवू लागला. व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्याची सुरुवात कायम ७ फेब्रुवारी पासून होते आणि १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येतो.

या सात दिवसांत आपण फक्त पर्टनरवर नाही तर, आपल्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींवर देखील प्रेम व्यक्त करू शकतो.आई, बाबा, भाऊ, बहिण, बेस्टफ्रेंड.. अनेकांवर प्रेमाचा वर्षाव करु शकतो. प्रमेच्या या आठवड्यात अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला खास भेटवस्तू देतात आणि प्रेम व्यक्त करतात.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?