Vastu Tips : घरात लादी पुसताना ३ चुका टाळा, अन्यथा समस्यांचा डोंगर राहील उभा

घरात लादी पुसताना तीन चुका टाळणे फायदेशीर ठरू शकते. वास्तूशास्त्रात याविषयी उल्लेख करण्यात आला आहे.

Vastu Tips : घरात लादी पुसताना ३ चुका टाळा, अन्यथा समस्यांचा डोंगर राहील उभा
| Updated on: Aug 03, 2026 | 6:45 PM

घरातील साफसफाई ही केवळ स्वच्छता राखणे, इतक्यापर्यंत मर्यादित नसते. घरातील फरशी पुसण्याचा संबंध थेट सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशी जोडला जातो. घरातील लादी योग्यप्रकारे पुसल्यास घरात आनंद, समृद्ध आणि शांतता नांदते. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. यासाठी फरशी पुसता काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते, असा दावा वास्तूशास्त्रात करण्यात आला आहे. या महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

वास्तूशास्त्रानुसार, घरात सूर्योदयानंतर घर पुसणे शुभ मानले जाते. सकाळी सूर्य उगवल्यानंतर फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच दिवस उजाडण्याआधी फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते. तर दुपारी 12 नंतर फरशी पुसणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. लोकांना सकाळी 7 ते 10 वाजताच्या दरम्यान स्वच्छता किंवा फरशी पुसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे घरात वातावरण शुद्ध राहते.

वास्तूशास्त्रात आठवड्यात काही दिवसांना विशेष महत्व देण्यात आलं आहे. गुरुवार हा भगवान विष्णू देवाला समर्पित केला जातो. त्यामुळे त्यादिवशी घरातील फरशी पुसणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यादिवशी केवळ फरशी पुसण्याऐवजी झाडण्याचा सल्ला दिला जातो. तसेच एकादशीला देखील फरशी न पुसण्याचा सल्ला दिला जातो. दोन्ही दिवशी फरशी पुसल्याने धन आणि समृद्धीचे नुकसान होण्याची शक्यता वास्तूशास्त्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे साफसफाईसाठी योग्य दिवसाची निवड करणे गरजेचे असल्याचे म्हटलं गेलं आहे.

शनिवार हा शनिदेवाला समर्पित दिवस आहे. या दिवशी मीठ मिसळलेल्या पाण्याने घरातील फरशी पुसल्याने नकाात्मक ऊर्जा कमी होते. तसेच गरिबी दूर होते, असाही विश्वास व्यक्त करणायात आला आहे. धर्मग्रंथात मीठ शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे. घरात सकात्मकता निर्माण होण्यासाठी घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यात मीठ मिसळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे घरात स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना वाढते, असाही वास्तूशास्त्रात उल्लेख आहे.

टीप : लेखातील माहिती वास्तूशास्त्रातील आधारानुसार देण्यात आली आहे. यातील माहिती खरी असल्याचा आमचा अजिबात दावा नाही. सविस्तर माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us