AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Shopping Places : मुंबईत ‘या’ 5 मार्केटमध्ये करा भरपूर शॉपिंग, तिसरा सर्वात स्वस्त मस्त

Best Shopping Places : मुंबईत असे अनेक मार्केट आहेत, जिथे फार कमी पैशांत तुम्ही शॉपिंग करु शकाल. या मार्केटमध्ये तु्म्हाला 100 रुपयांपासून हजार रुपये आणि त्यापुढे देखील शॉपिंग करता येईल... तर जाणून घ्या मुंबईतील अशा मार्केट बद्दल

Best Shopping Places : मुंबईत 'या' 5 मार्केटमध्ये करा भरपूर शॉपिंग, तिसरा सर्वात स्वस्त मस्त
| Updated on: Sep 24, 2026 | 10:14 AM
Share

Best Shopping Places : मुंबई हे एक असं शहर आहे, जेथे दररोज लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. मुंबईत शॉपिंग करणं देखील त्यांच्यासाठी फार नवीन असतं. तर मुंबईतील काही ठिकाणी असे मार्केट आहेत, जिथे शॉपिंग करणं खिशाला परवडणारं आहे. आजच्या काळात शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. पण मॉल आणि महागड्या दुकांमधून वस्तू घेणं कोणाला परवडत नाही. पण मुंबईत अनेक असे मार्केट आहेत. जिथे स्वतः आणि मस्त वस्तू मिळतील. पण एक मार्केट तर असं आहे, जेथे अनेक वस्तू फार कमी दरात म्हणजे होलसेलच्या दरात मिळतात. मुंबईतील बाजारांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे मिळणाऱ्या वस्तू आहेत. मुंबईच्या कोणत्या बाजारपेठांमध्ये तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता ते जाणून घेऊया.

क्रॉफर्ड मार्केट : मुंबईत खरेदी करायची असेल तर क्रॉफर्ड मार्केटला तुम्ही भेट देणं आवश्यक आहे. क्रॉफर्ड मार्केट हे शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. फळे, भाज्या, पिशव्या, मेकअप, घरातील सजावटीच्या वस्तूंपासून ते खेळण्यांपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील.

लिंकिंग रोड : विविध प्रकारचे परवडणारे आणि ट्रेंडी कपडे, दागिने, शूज लिंकिंग रोडवरील बाजारात मिळतील. मुंबईत रस्त्यावरील खरेदीच्या अनुभवासाठी लिंकिंग रोड आपल्या यादीत असणं आवश्यक आहे. लिकिंग रोड वांद्रे येथे आहे. हे शहरातील खरेदीदारांसाठी मोठ मार्केट आहे. येथील बाजारात काही ब्रँडेड शोरूम आणि बुटीक देखील आहेत.

हिंदमाता मार्केट : जर तुम्ही विविध प्रकारचे कापड, साड्या, ड्रेस मटेरियल आणि भारतीय पोशाख शोधत असाल तर थेट या दादर बाजारात जा आणि तुम्हाला जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी घाऊक कपड्यांची बाजारपेठ आहे. लग्नाच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण. तुम्ही तुमच्या बजेटनुसार येथे खरेदी करू शकता.

कुलाबा कॉजवे : कुलाबा कॉजवे मुंबईच्या सर्वात लोकप्रिय बाजारपेठांपैकी एक आहे. या बाजारात बरीच वर्दळ दिसून येते. कृत्रिम दागिने, वैयक्तिक दागिने, प्रासंगिक पाश्चिमात्य पोशाख, पादत्राणे, पिशव्या ते प्राचीन वस्तूंपर्यंत, या ठिकाणी शॉपिंगला भरपूर वाव आहे. या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी असते. इथं तुम्ही आनंदानं खरेदी करु शकता.

Follow Us
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती