AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Diet Plan : उकाड्याच्या त्रासापासून बचाव करायचाय? मग आपल्या डाएटमध्ये करा हे बदल

सतत घाम येत असल्यामुळे आपणाला थकवा जाणवतो. उकाड्यापासून वाचायचे असेल तर आपल्या आहारातही काही बदल करणे गरजेचे आहे. (want to avoid trouble of hit, then make these change in your diet)

Summer Diet Plan : उकाड्याच्या त्रासापासून बचाव करायचाय? मग आपल्या डाएटमध्ये करा हे बदल
Summer Diet Plan
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 24, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : मार्च संपण्याआधीच गरमीचा तडाखा वाढला आहे. पार्‍याने आतापासूनच अधूनमधून विक्रमी उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. भर उन्हात चालताना आपली चांगलीच दमछाक होत आहे. सतत घाम येत असल्यामुळे आपणाला थकवा जाणवतो. यातूनच डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे अशा विविध व्याधींना निमंत्रण मिळते. उन्हाळ्यातील या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. उकाड्यापासून वाचायचे असेल तर आपल्या आहारातही काही बदल करणे गरजेचे आहे. (want to avoid trouble of hit, then make these change in your diet)

1. सकाळची सुरुवात पाण्याने करा. कमीत कमी दोन ग्लास पाणी प्या. सकाळी तोंडात अशी काही द्रव्ये असतात, ज्यामुळे पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. तोंड न धुताच पाणी प्यायल्यामुळे आरोग्यदायी स्वरुपाची द्रव्ये आपल्या शरीरात पोहोचतात.

2. शक्य असल्यास पाण्यासोबत अर्धा चमचा ओवा खा. उन्हाळ्यात गॅस आणि आंबटपणाचा त्रास होतोच. उन्हाळ्यातील या सामान्य समस्या आहेत. ओवा खाल्ल्यामुळे अशा त्रासांपासून आराम मिळतो. पाण्याबरोबर ओवा खाल्ल्यानंतर सुमारे एक तास काहीही खाऊ नका.

3. जर आपल्याला चहाची सवय असेल तर त्याऐवजी ग्रीन टी पिण्यास सुरूवात करा. चहामुळे गॅस आणि आंबटपणाची समस्या वाढते. आपण सकाळी एक ग्लास सरबत घेतल्यास आरोग्यासाठी चांगले असेल. आपण मोसंबी, संत्रा, डाळिंब, टरबूज इत्यादींचा ज्यूस पिऊ शकता.

4. नाश्त्यात स्प्राउट्स, ओट्स, पोहा, उपमा आणि रोस्टेड ब्रेड खा.

5. घरातून बाहेर पडताना आपल्याबरोबर बाटलीमध्ये शिकंजी घेऊन जा. शिकंजी तुमचे पोट आणि मेंदू थंड ठेवण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त शरीरात तत्काळ उर्जा देण्याचे कार्य करेल. शिकंजी शरीरातील पाण्याची उणिव भरून काढते. परंतु उन्हातून आल्यानंतर लगेच हे पिऊ नका. थोडा वेळ थांबा आणि मग प्या.

6. जेवणात डाळ, तांदूळ, चपाती, भाजी, ताक आणि कोशिंबीर घ्या. कोशिंबीरीमध्ये काकडी, कांदा, मुळा टोमॅटो इत्यादी खा. यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होईल. तसेच शौचाचा त्रास थांबेल.

7. तुमच्या बॅगमध्ये भाजलेले चणे आणि बिस्किट वगैरे ठेवा. जेवल्यानंतर दोन तासांनी आपण हे भाजलेले चणे आणि बिस्किट स्नॅक म्हणून खाऊ शकता.

8. रात्रीचे हलके जेवण घ्या. भाजीमध्ये दूधी, भेंडी, लुफा इत्यादी पाणीदार पालेभाज्या खा. चपाती कमी खा, पण भाज्या पुरेशा प्रमाणात खा. बाहेरचे खाणे टाळा. जेवल्यानंतर एक तासाने एक कप दूध नक्की प्या. (want to avoid trouble of hit, then make these change in your diet)

इतर बातम्या

SBI Clerk 1st Waiting List : स्टेट बँक भरतीची लेटिंग लिस्ट जारी, अशी करा डाऊनलोड

Kabaddi in Telangana: तेलंगणाच्या सूर्यापेटमधील कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली, 50 हून अधिक जखमी

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...