
उन्हाळ्यात घामाच्या वासामुळे अनेक जण परफ्यूमचा वापर करतात. स्वच्छ व सुंदर सुगंधासाठी परफ्यूम ही पहिली पसंती असते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की अनेकदा आपण परफ्यूम लावताना काही चुकीच्या सवयींमुळे त्याचा सुगंध फार वेळ टिकत नाही? परफ्यूम लावण्याचे काही खास नियम असतात, जे पाळले तर महागडे परफ्यूमही संपूर्ण दिवस तुमच्या अंगावर सुगंध देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया परफ्यूम दीर्घकाळ टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
1. परफ्यूम लावण्याची योग्य जागा निवडा
परफ्यूम लावण्याची योग्य ठिकाणं म्हणजे शरीरातील ‘पल्स पॉइंट्स’ जिथे रक्ताभिसरण जास्त असतो. यामध्ये कलाई, मान, कानामागची जागा, कोपऱ्याची आतली बाजू आणि गुडघ्यांच्या मागची जागा यांचा समावेश होतो. या भागांवर परफ्यूम लावल्यास शरीराच्या उष्णतेमुळे त्याचा सुगंध अधिक काळ टिकतो.
2. मॉइश्चराइज केलेल्या त्वचेवर परफ्यूम लावा
कोरड्या त्वचेवर परफ्यूम लावल्यास त्याचा सुगंध लगेचच उडून जातो. त्यामुळे परफ्यूम लावण्यापूर्वी त्वचेवर हलका मॉइश्चरायझर लावल्यास परफ्यूम त्वचेशी चांगल्या प्रकारे मिक्स होतो आणि अधिक वेळ टिकतो.
3. परफ्यूम थेट कपड्यांवर स्प्रे करू नका
खूप लोक परफ्यूम थेट कपड्यांवर मारतात, पण हे चुकीचं आहे. यामुळे सुगंध लवकर उडून जातो आणि काही वेळा कपड्यांवर डागही पडू शकतात. परफ्यूम नेहमी त्वचेवरच स्प्रे करा, जेणेकरून तो त्वचेशी मिसळून नैसर्गिकपणे सुगंध देतो.
4. परफ्यूमची बाटली हलवू नका
काही लोक परफ्यूम लावण्यापूर्वी बाटली जोरात हलवतात. पण हे करणे चुकीचे आहे. यामुळे परफ्यूमच्या कंपोजिशनवर परिणाम होतो आणि त्याची गुणवत्ता कमी होते. म्हणून परफ्यूम वापरण्यापूर्वी त्याला हलवू नका.
5. परफ्यूम लावल्यानंतर हात रगडू नका
अनेकांना सवय असते की, परफ्यूम लावल्यानंतर कलाई एकमेकींवर रगडतात. हे टाळा. यामुळे परफ्यूमचे टॉप नोट्स लवकर उडून जातात आणि सुगंध फारसा टिकत नाही.
टीप: परफ्यूममध्ये अल्कोहोल असतो, जो चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला नुकसान करू शकतो. त्यामुळे परफ्यूम लावताना चेहरा टाळा. याशिवाय, आपल्या त्वचेला शोभेल असा आणि नैसर्गिक गुणधर्म असलेला परफ्यूम निवडणंही महत्त्वाचं आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)