Health | अ‍ॅनिमिया, कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर फायदेकारक ‘व्हीट ग्रास ज्यूस’!

व्हीट ग्रासमध्ये मॅग्नेशिअम, व्हिटामिन ए, ई, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. या घटकांची आपल्या शरीरालादेखील आवश्यकता असते.

Health | अ‍ॅनिमिया, कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर फायदेकारक ‘व्हीट ग्रास ज्यूस’!
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 7:02 PM

मुंबई : गव्हाच्या हिरव्या रोपट्याला ‘व्हीट ग्रास’ म्हणतात. नेहमीच्या खाण्यापिण्यात आणि डाएटमध्येदेखील व्हीट ग्रासचा उपयोग फायदेकारक ठरतो. सामन्य तापमानाची गरज असल्याने गव्हाचे पीक केवळ देशातच नव्हे तर जगभरात घेतले जाते. व्हीट ग्रासमध्ये मॅग्नेशिअम, व्हिटामिन ए, ई, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. या घटकांची आपल्या शरीरालादेखील आवश्यकता असते. व्हीट ग्रासचा रस हा आरोग्यासाठी अतिशय फायदेकारक ठरतो.(Wheat Grass Juice benefits)

व्हीट ग्रासमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात.

व्हीट ग्रासमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडेंट्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. व्हीट ग्रासचा रस पिण्यामुळे कर्करोगाच्या पेशी फार लवकर मरतात आणि नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. कर्करोगासारखा आजार टाळण्यासाठी या व्हीट ग्रास रसाचे नक्कीच सेवन करा. व्हीट ग्रासच्या रसात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या शरीरास निरोगी, मजबूत आणि बळकट बनविण्यात मदत करतात. (Wheat Grass Juice benefits)

प्रतिकारशक्ती वाढवते.

व्हीट ग्रासमध्ये 17 वेगवेगळ्या प्रकारचे अमीनो अ‍ॅसिड असतात आणि हेच व्हिटामिनचे मुख्य स्त्रोत असतात. दररोज व्हीट ग्रासचा रस घेतल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यामध्ये फायबरचे गुणधर्म आहेत जे आपल्या पचनशक्ती वाढविण्यास मदत करतात.

कार्बोहायड्रेटम कमी तर, प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते.

व्हीट ग्रासमध्ये कॅलरीनसतात आणि हा वनस्पती-आधारित प्रोटीन्सचा चांगला स्रोत आहे. आपल्याला शाकाहारी पर्यायात योग्य प्रमाणात प्रोटीन मिळवायचे असेल, तर व्हीट ग्रास एक चांगला प्रोटीन पूरक आहे. कॅलरी कमी झाल्यामुळे कोलेस्टेरॉल देखील कमी होते. (Wheat Grass Juice benefits)

क्लोरोफिल असल्याने हिमोग्लोबिन वाढते

व्हीट ग्रासचा रस अर्थात गव्हाच्या वनस्पतीपासून बनविला जातो, ज्यात क्लोरोफिलची मात्रा अधिक असते. क्लोरोफिल शरीरात लाल पेशी निर्माण करण्यास उपयुक्त ठरते आणि यामुळे हिमोग्लोबिन वाढते. यामुळे अशक्तपणासारख्या आजारांपासून मुक्तता होते. रजोनिवृत्तीमध्ये अशक्तपणा अधिक असतो, तेव्हा हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी स्त्रियांनी दररोज हा रस घ्यावा.

व्हीट ग्रासचे प्रकार

आपण टॅब्लेट किंवा रस सारख्या प्रकारात व्हीट ग्रासचे सेवन करू शकता. व्हीट ग्रासची चव उग्र असल्याने त्याचा रस तयार करताना इतर घटक त्यात मिसळणे फायदेशीर ठरते. उग्र चवीमुळे व्हीट ग्रास रस पिणे टाळले जाते. परंतु, आपण या रसात आपल्या आवडत्या गोष्टी घालू शकतो.

(Wheat Grass Juice benefits)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....