Protein Food | प्रोटीनसाठी ‘आर्टिफिशियल सप्लीमेंट्स’ऐवजी, आहारात करा ‘या’ नैसर्गिक घटकांचा समावेश!

आहारातल्या प्रथिनांनच्या प्रमाणावर आपल्या शरीराचे वजनमान अबलंबून असते. प्रोटीन्स आपल्या आहाराला संतुलित बनवतात.

Protein Food | प्रोटीनसाठी ‘आर्टिफिशियल सप्लीमेंट्स’ऐवजी, आहारात करा ‘या’ नैसर्गिक घटकांचा समावेश!

मुंबई : आहारातल्या प्रथिनांनच्या प्रमाणावर आपल्या शरीराचे वजनमान अबलंबून असते. प्रथिने अर्थात प्रोटीन्स हा असा घटक आहे, जो आपल्या आहाराला संतुलित बनवू शकतो. शरीराला योग्यप्रमाणात योग्य प्रमाणात प्रोटीन मिळाल्यास स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. बरेच लोक प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी ‘प्रोटीन शेक’, ‘सप्लीमेंट्स’ घेणे सुरू करतात. परंतु हे कृत्रिम पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. या ऐवजी पर्याय म्हणून आपण आहारात नैसर्गिक प्रथिनेयुक्त घटकांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.( Natural protein food items best option for artificial supplements)

प्रोटीन्स हे आपल्या शरीराला पोषण देणाऱ्या घटकांपैकी एक आहे. प्रोटीन्समध्ये शरीराला आवश्यक असणारे अमिनो अ‍ॅसिड असते. एका दिवसाला पुरुषाच्या शरीराला सरासरी 56 ग्रॅम प्रथिने, तर स्त्रीला सरासरी 46 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. आहारातील ‘हे’ घटक नैसर्गिकरीत्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढतील.

 

शेंगदाणे

शेंगदाणा हा प्रोटीनचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. विशेष म्हणजे शेंगदाणे बाजारात सहज उपलब्ध असतात. 100 ग्रॅम शेंगदाणे शरीराला 26 ग्रॅम प्रोटीन देऊ शकतात. 1 किलो शेंगदाण्याची किंमत 80 ते 100 रुपये असल्याने, दिवसाला केवळ 10 रुपयांत तुम्हाला नैसर्गिक प्रोटीन मिळू शकते.( Natural protein food items best option for artificial supplements)

सोयाबीन

सोयाबीन या शाकाहारी घटकात भरपूर प्रमाणात प्रथिने आढळतात. 100 सोयाबीनमुळे शरीराला जवळपास 50 ग्रॅम प्रोटीन मिळते. शिवाय बजेटमध्ये असल्याने खिशालाही कात्री लागत नाही.

ओट्स

ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्सदेखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. साधारण 150 रुपये किलो असणारे ओट्स बाजारात सहज उपलब्ध होतात.

काळे चणे

काळे चणेदेखील प्रोटीन्सचा उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. काळ्या चाण्यांना ‘बंगाल ग्राम’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. 100 ग्रॅम चाण्यांमध्ये 19 ग्रॅम प्रोटीन असते. शिवाय हा घटक आपल्या नेहमीच्या जेवणात देखील समाविष्ट असतो.

(Natural protein food items best option for artificial supplements)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *