भारतात 10 वर्षांनी BMI चे नियम बदलले, महिला आणि पुरुषांसाठी फिटनेसचं नवं वजन काय?

तब्बल 10 वर्षांनी भारतात बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयचे नियमही बदलले आहेत (New Formula of Body Mass Index BMI 2020 for India).

भारतात 10 वर्षांनी BMI चे नियम बदलले, महिला आणि पुरुषांसाठी फिटनेसचं नवं वजन काय?

मुंबई : जगभरात काळानुसार आहारापासून पेहरावापर्यंत अनेक गोष्टी बदलतात. त्याचप्रमाणे आता तब्बल 10 वर्षांनी भारतात बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयचे नियमही बदलले आहेत (New Formula of Body Mass Index BMI 2020 for India). त्यामुळे महिला आणि पुरुषांच्या फिटनेसच्या वजनाचा आकडाही बदलला आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीय महिला आणि पुरुषांसाठी वजन आणि उंचीच्या नियमांमध्ये नवे बदल केले आहेत. एनआयएनने (NIN) तंदुरुस्त वजनात 5 किलोंची वाढ केली आहे. त्यामुळे भारतात फिट पुरुषांचं वजन 65 किलो, तर महिलांसाठी 55 किलो झालंय.

याआधी 2010 मध्ये पुरुषांचं सरासरी 60 किलो वजन फिट मानलं गेलं होतं. आता 2020 मध्ये फिटनेसचं हेच वजन 65 किलो झालं आहे. एक दशकापूर्वी महिलांचं फिटनेस दर्शवणारं वजन सरासरी 50 किलो झालं होतं. ते आता वाढून 55 किलो करण्यात आलं आहे. या सर्वसामान्य सूत्रासाठी याआधी पुरुषांची उंची 5 फूट 6 इंच म्हणजेच 171 सेंटीमीटर आणि महिलासाठीची 5 फूट म्हणजेच 152 सेंटीमीटर इतकी गृहीत धरण्यात आली होती. नव्या नियमानुसार आता पुरुषांची उंची वाढून 5 फूट 8 इंच इतकी करण्यात आली, तर महिलांची उंची 5 फूट 3 इंच करण्यात आली आहे.

संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीय नागरिकांच्या पोषण आहारात वाढ झाली आहे त्यामुळे त्यांच्या फिटनेसची मोजणी करणाऱ्या बीएमआयमध्ये (BMI) देखील बदल झाले आहेत. यावर्षीच्या संशोधन डाटात ग्रामीण भागांचाही समावेश करण्यात आला आहे. 10 वर्षांपूर्वीच्या बीएमआय सर्वेत केवळ शहरी भागाचा समावेश करण्यात आला होता. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनने सोमवारी (28 सप्टेंबर) हा नवा अहवाल प्रकाशित केला आहे.

महिलांच्या आणि पुरुषांच्या संदर्भ वयातही (रेफरन्स एज) बदल

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनने (NIN) आपल्या 2020 च्या अहवालात भारतीयांसाठीच्या पोषण आहार (RDR) आणि अंदाजे शारीरिक आवश्यकता (EAR) यांच्या प्रमाणात देखील बदलाची शिफारस करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांच्या रेफरन्स एजमध्ये बदल करण्यात आलाय. 2010 मधील 20 ते 39 वयाऐवजी आता 19 ते 39 असं वय ठरवण्यात आलं आहे. 1989 च्या तज्ज्ञांच्या समितीने केवळ लहान मुलं आणि किशोरवयीन तरुणांच्याच वजन आणि उंचीचा समावेश केला होता. 2010 च्या समितीने केवळ 10 राज्यांचे सॅम्पल सर्वे घेतले होते. दोन्ही समित्यांनी पुरुषांसाठी रेफरन्स वजन 60 किलो आणि महिलासाठी 50 किलो गृहित धरलं होतं.

2020 मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्वे

2020 मधील तज्ज्ञांच्या पॅनलने देशभरातून माहिती संकलन केलं आहे. यात वेगवेगळ्या संस्थांकडून झालेल्या सर्वेतील माहितीचा समावेश आहे. पहिल्यांदाच आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी बीएमआय निश्चित करताना फायबर आधारित पोषक द्रव्यांचाही विचार केला आहे. पहिल्यांदाच आहारात किती प्रमाणात कार्बोहायड्रेट घ्यावेत, मुलांसाठी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट द्यायचे या सर्व सुक्ष्म गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. इतकंच नाही तर महिला, पुरुष आणि मुलांच्या खाण्यात पॉटेशियम, फॅट, प्रोटीन आणि मीठ किती असावं याचेही तपशील देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास

सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं

फिट राहण्यासाठी आता जिममध्ये जाण्याची गरज नाही

New Formula of Body Mass Index BMI 2020 for India

Published On - 7:20 pm, Tue, 29 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI