सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं

मुंबई : भारताची टेनिसस्टार  सानिया मिर्झा सध्या तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सानियाने मुलाला जन्म दिला. मात्र प्रेग्नंसीदरम्यान सानियाचं वजन वाढलं होतं. पण मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाने केवळ पाच महिन्यात तब्बल 22 किलो वजन कमी केलं आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर सानिया मिर्झाला एवढ्या कमी वेळात वजन कमी करणं सोपं नव्हतं. पण स्वत:चा फिटनेस व्यवस्थित […]

सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : भारताची टेनिसस्टार  सानिया मिर्झा सध्या तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सानियाने मुलाला जन्म दिला. मात्र प्रेग्नंसीदरम्यान सानियाचं वजन वाढलं होतं. पण मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाने केवळ पाच महिन्यात तब्बल 22 किलो वजन कमी केलं आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर सानिया मिर्झाला एवढ्या कमी वेळात वजन कमी करणं सोपं नव्हतं. पण स्वत:चा फिटनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी सानियाने मेहनत घेत वजन आटोक्यात आणलं आहे.

प्रेग्नंसीदरम्यान सानिया मिर्झाचे वजन 89 किलो इतकं झालं होते. मात्र डिलिव्हरीच्या 15 दिवसांनंतर सानियाने व्यायाम करण्यास सुरुवात केली. तिने केवळ पाच महिन्यात वजन 22 किलोनी कमी करत 67 किलोवर आणलं. मुलाला जन्म दिल्यानंतर महिला आपल्या वाढत्या वजनामुळे जास्त चिंतेत असतात. पण सानिया सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

एका मुलाखतीमध्ये सानिया म्हणाली, “आई झाल्यानंतर महिला फिट राहून एक सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. आई झाल्यावर तुमचे जीवन संपते असं नसून उलट आयुष्याची सुरुवात इथून होते”.

“मी टेनिस खेळेन अथवा नाही. मात्र जास्त वजनासोबत मला स्वत:ला आरशात बघवत नव्हतं. मला आरोग्यदायी जीवन हवं, कारण आरोग्यदायी राहणं मला छान वाटतं”, असं सानियाने सांगितलं.

सानिया स्वत: ला आरोग्यदायी ठेवण्यासाठी दररोज चार तास व्यायाम करते. जवळपास 100 मिनिटं कार्डियो करते, 1 तास किक बॉक्सिंग करते. तसेच दररोज योगाही करते. त्यामुळेच तिने इतकं वजन कमी केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें